मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कारच्या साइड मिररसंदर्भात तुम्ही तर करत नाही ना ही चूक? ती आत्ताच बदला

कारच्या साइड मिररसंदर्भात तुम्ही तर करत नाही ना ही चूक? ती आत्ताच बदला

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

अनेकांना हे साईड मिरर्स नक्की कोणत्या कामासाठी आहे हेच कळत नाही, तेव्हा त्याचे परिणाम गंभीर होतात. हे अत्यंत धोकादायक असून यामुळे अपघाताची शक्यता वाढते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 28 नोव्हेंबर : रस्ते अपघातासंदर्भात अनेक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर आले आहेत. यामध्ये कधी स्वत:च्या चुकीमुळे तर कधी दुसऱ्याच्या चुकीमुळे लोकांनी आपले प्राण गमवले आहेत. तर काही जण जखमी देखील झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावरुन चालताना किंवा गाडी चालवताना एक्ट्राची काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच यासाठी रस्ते नियमांचं पालन करणं देखील तेवढंच गरजेचं आहे.

हे सगळे प्रकरण पाहाता काही लोक अति दक्षता घेतात. पण असं असलं तरी देखील अशी एक चुक आहे, जे अनेक लोक गाडी चालवताना करतात. त्याचा त्रास गंभीर अपघाताच्या रूपाने सहन करावा लागतो. ही गोष्ट कारच्या साईड मिरर्स संबंधीत आहे.

जे ड्रायव्हर्स मिरर बंद ठेवतात किंवा त्याच्या सह्याने गाडी चालवत नाहीत. तसेच अनेकांना हे साईड मिरर्स नक्की कोणत्या कामासाठी आहे हेच कळत नाही, तेव्हा त्याचे परिणाम गंभीर होतात. हे अत्यंत धोकादायक असून यामुळे अपघाताची शक्यता वाढते.

हे ही पाहा : रस्ता अपघाताचा थरारक Video, ब्लाइंड स्पॉटमुळे डंपरनं तरुणीला चिरडलं

साइड मिररचे काम फक्त मागून येणारी वाहने पाहण्यासाठी मदत करणे एवढेच नसते, तर इतरही अनेक प्रकारच्या सुरक्षेत मदत होते. तर आज आम्ही तुम्हाला कार साइड मिरर सेट करण्याची योग्य पद्धत आणि त्याचा वापर याबद्दल सांगणार आहोत.

साइड मिररचे फायदे

कोणत्याही वाहनाला ड्रायव्हरच्या सीटच्या बाहेर आणि दुसऱ्या बाजूला छोटे आरसे असतात, ज्याला साइड मिरर्स म्हणतात. बाकीच्या आरशांपेक्षा हे आरसे थोडे वेगळे आहे, कारण त्यात पाहिलं की लांबून येणारी गाडीही जवळच दिसते. मागून येणाऱ्या सर्व वाहनांची माहिती चालकाला व्हावी, यासाठी हे आरसे दिले जातात. तसेच, ओव्हरटेक करताना आपल्या पोझिशनच्या पुढे धावणाऱ्या वाहनाला आपली पोझिशन सांगण्यासही मदत होते.

याशिवाय गाडीच्या केबिनमध्ये बॅक मिररही देण्यात आला आहे. या तीन आरशांचा वापर करून वाहन चालकाला वाहनांची नेमकी स्थिती काय आहे, याची माहिती मिळते.

चुकीच्या कोनात साईड मिरर असण्याचे तोटे

बाजूच्या आरशाचे काम वाहन चालकाला वाहनांच्या योग्य स्थितीची माहिती देणे हे असते, परंतु त्यांना काटकोनात किंवा त्याचा एँगल नीट बसविणे देखील खूप महत्वाचे आहे. ती नीट ठेवले नाही, तर मागे येणाऱ्या कोणत्याही वाहनाची माहिती मिळणे कठीण होऊन बसते आणि त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते.

त्याचबरोबर अनेकवेळा वाहनचालक ते बंद करतात. यामुळे एक प्रकारचा ब्लाइंड स्पॉट तयार होतो आणि ड्रायव्हरला गाडीच काय तर कोणतीही वस्तू दिसत नाही. त्यामुळे अपघात होतात. भारतातील सर्वाधिक अपघातांचे हेही एक मोठे कारण आहे.

त्यामुळे गाडीचा मिरर योग्य एँगलमध्ये ठेवा आणि शक्यतो, कोणताही ब्लाईंड स्पॉट तयार होणार नाही याची काळजी देखील घ्या.

First published:

Tags: Car, Social media, Top trending, Videos viral, Viral, While driving