मुंबई 28 नोव्हेंबर : सोशल मीडियावर एक अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ हृदयाचा ठोका चुकवणारा आहे. या व्हिडीओमध्ये एका दुचाकी तरुणीला डंपरनं चिरडलं आहे. ज्यानंतर डंपर चालक घटना स्थळावरुन फरार झाला आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. त्यानंतर अता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की ही तरुणी एका जागेवर उभी असताना डंपर चालक तिला न पाहाता चिरडून पुढे जातो. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये झालेल्या रस्ते अपघाताचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक विद्यार्थी चौकात उभा असलेला दिसत आहे. इतक्यात तिच्या शेजारी उभा असलेला डंपर तिला चिरडतो. हे ही पाहा : मृत्यूचा थरार! भरधाव कारने तरुणीला फुटबॉल सारखं उडवलं, Video सोशल मीडियावर व्हायरल या संपूर्ण व्हिडीओमध्ये निष्काळजी डंपर चालकाला स्कुटीवरून आलेली विद्यार्थी त्याच्या शेजारी उभी असलेली कशी दिसत नाही? असाच प्रश्न तुम्हाला हा व्हिडीओ पाहून वाटेल. या डंपर चालकाने त्याच्या साइड मिररचा तरी वापर करायला हवा होता, असं अनेकांचं म्हणणं आहे. व्हिडीओमध्ये हे दिसत आहे की ही तरुणी ट्रफिक क्लिअर होण्याची वाट पाहात उभी असते आणि तिच्या बाजूला डंपर असतो. तेव्हा हा डंपर चालक आपली गाडी सुरु करतो आणि डाव्या बाजूला गाडी फिरवुन जातो. त्यावेळी तो बाजूला असलेल्या मुलीली चिरडतो.
@patrikacg
— DHALSINGH PARDHI (@DhalsinghP) November 27, 2022
raipur me accident... pic.twitter.com/1KafAM8blj
मुलीची धडक होऊनही डंपरचालकाने गाडी न थांबवता स्कुटीसह तिच्या अंगावरुन गाडी नेली आणि तेथून पळ काढला. तेलीबांधा पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी दुपारी अग्रसेन धामच्या चौकाजवळ हा अपघात झाला.
हे ही पाहा : ती पडली, सरकली आणि अचानक गायब झाली… रस्ता अपघाताचा ‘हा’ व्हिडीओ ठरला चर्चेचा विषय
आकृती मिश्रा असं या मुलीचं नाव होतं. ती मुळची राजनांदगावची आहे. अपघातानंतर काही प्रवाशांनी पोलिसांना माहिती दिली. या मुलीला गंभीर अवस्थेत डीकेएस रुग्णालयात नेण्यात आलं, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. यानंतर मुलीचा मृतदेह राजनांदगाव येथे पाठवण्यात आला.
आकृती मिश्रा
आकृतीच्या वडिलांचे काही काळापूर्वी निधन झाले होते. आकृती तिचा भाऊ अंकुर आणि आईसोबत राहत होती. गेल्या काही काळापासून ती रायपूरच्या जोरा भागात भाड्याच्या खोलीत राहत होती. आकृती इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाची विद्यार्थिनी होती. आकृतीचा भाऊ अंकुरने सांगितले की, अपघाताच्या काही वेळ आधी तिने घरच्यांशी चर्चा केली होती. आपली तब्येत बरी नाही, तिला घरी यायचं आहे, असं तिने सांगितलं. कॉलेजमधून सुट्टी घेऊन ती आपल्या खोलीत जाऊन पॅकिंग करणार होती, पण वाटेतच हा अपघात घडला. या अपघातानंतर कुटुंबाची अवस्था वाईट आहे, मुलगी घरी परतणार होती पण तिचा मृतदेह आला. ज्यामुळे कुटुंबावर दुखाचं डोंगर कोसळलं आहे.