• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • एका स्पर्धकाची चूक सर्वांनाच पडली महागात; सायकल रेसमधील भयंकर दुर्घटनेचा Video Viral

एका स्पर्धकाची चूक सर्वांनाच पडली महागात; सायकल रेसमधील भयंकर दुर्घटनेचा Video Viral

जगभरात लोकप्रिय असलेला फ्रान्समधील सायकल रेल 'टूर डी फ्रांस’लाही (Tour de France) सुरुवात झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी ही रेस (Cycle Race) चर्चेत आली आहे

 • Share this:
  नवी दिल्ली 28 जून : कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) मागील बऱ्याच काळापासून घरामध्ये कैद असलेले लोक आता हळूहळू नॉर्मल लाईफस्टाइलकडे वळण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान मागील काही काळापासून बंद असणाऱ्या अनेक गोष्टींचं नव्यानं आयोजन करण्यास सुरुवातही झाली आहे. अशात आता जगभरात लोकप्रिय असलेला फ्रान्समधील सायकल रेल 'टूर डी फ्रांस’लाही (Tour de France) सुरुवात झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी ही रेस (Cycle Race) चर्चेत आली आहे. रेस दरम्यान घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Accident Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फ्रान्समधील प्रसिद्ध सायकल रेस टूर डी फ्रांसला सुरुवात होताच दोन मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. रायडर्स ब्रेस्ट आणि लँडरन्यू यांच्यातील रेसचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाली हसूही येईल आणि दुःखदेखील होईल. या रेसला सुरुवात होताच एकापाठोपाठ एक सायकलस्वार रस्त्यावर कोसळू लागले. तेदेखील केवळ एका व्यक्तीच्या चुकीमुळे VIDEO : सासरी प्रवेश करताच नव्या नवरीचं धक्कादायक कृत्य; उपस्थितही हैराण या रेसमध्ये पहिली दुर्घटना टोनी मार्टिनमुळे घडली. सायकल चालवताना तो ट्रॅकवर साईन बोर्ड घेऊन असलेल्या एका दर्शकाला जाऊन धडकला. समर्थक ट्रॅकवर बोर्ड घेऊन उभा राहिला होता. त्यानं समोरुन येणाऱ्या स्पर्धकांना पाहिलं नाही आणि जबरदस्त टक्कर झाली. सायकलवर असलेले मार्टिन बोर्डाला धडकले आणि बॅलन्स बिघडल्यानं ते खाली कोसळले. यानंतर त्यांच्या मागून येणाऱ्या अनेक स्पर्धकही एकापाठोपाठ कोसळू लागले. VIDEO: गप्पा सुरू असतानाच नवरी-नवरेदवाला आठवला कपड्यांना लावलेला माईक; अन्.. या घटनेत तब्बल 20 स्पर्धकांचा बॅलन्स बिघडला. यातील काहींनी स्वतःला सावरलं आणि पुढे निघून गेले. या क्रॅशमुळे काही रायडर्सला रिटायरही व्हावं लागलं. इतकंच नाही तर या घटनेनंतर रेसमध्ये आणखी एक दुर्घटना घडली. शेवटी अंतिम रेशेपासून केवळ सहा किलोमीटर दूर असतानाच एका सायकलस्वार कोसळला आणि रेसमधून बाहेर झाला. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोक हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच यावर भरपूर कमेंटही करत आहेत. नेटकऱ्यांनी अशा वेड्या दर्शकांना मॅचपासून दूर राहाण्याची विनंती केली आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: