• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • सासरच्या घरात प्रवेश करताच नव्या नवरीचं धक्कादायक कृत्य; उपस्थितही हैराण, पाहा VIDEO

सासरच्या घरात प्रवेश करताच नव्या नवरीचं धक्कादायक कृत्य; उपस्थितही हैराण, पाहा VIDEO

सध्या सोशल मीडियावर एका नवरीच्या गृहप्रवेशाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Bride) होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की गृहप्रवेशाच्या वेळी नवरीबाईनं असं काही केलं, जे पाहून कोणीही हैराण होईल.

 • Share this:
  नवी दिल्ली 28 जून: लग्नानंतर नवरीबाई (Newly Married Bride) जेव्हा घरी येते तेव्हा तिला घरातील लक्ष्मी समजलं जातं. तिला तांदळानं भरलेल्या कलशाला ओलांडून घरात प्रवेश कऱण्यासाठी सांगितलं जात. ही परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आली आहे आणि भारतीय संस्कृतीनुसार (Indian Tradition) या परंपरेचं पालनही केलं जातं. मात्र, सध्या अनेकदा लग्नसमारंभांमध्ये (Marriage Functions) अशी दृश्य पाहायला मिळतात, ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण होऊन जातं. नाक साफ करण्यासाठी कपलनं नाकात घातला लसूण; 20 मिनिटांनी जे घडलं ते किळसवाणं सध्या सोशल मीडियावर एका नवरीच्या गृहप्रवेशाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Bride) होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की गृहप्रवेशाच्या वेळी नवरीबाईनं असं काही केलं, जे पाहून कोणीही हैराण होईल. नवरीबाई सासरी पोहोचताच तिला तांदळानं भरलेल्या कलशाला धक्का देऊन घरात प्रवेश करण्यास सांगितलं जातं. मात्र, या व्हिडिओमध्ये नवरीनं या कलशाला इतकी जोरात लाथ मारली की तो बराच दूर जाऊन पडला.
  VIDEO: गप्पा सुरू असतानाच नवरी-नवरेदवाला आठवला कपड्यांना लावलेला माईक; अन्.. गृहप्रवेशाचं हे दृश्य पाहण्यासारखं होतं. हे सगळं पाहून घरातील सगळे लोकही हैराण झाले. हा व्हिडिओ पाहाण्यासाठी अत्यंत विनोदी (Funny Video) आहे. व्हिडिओ बातमी देईपर्यंत 50 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. तर, लाखो वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. कन्नडा व्हिडिओज नावाच्या पेजवरुन हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला गेला आहे. लोक या व्हिडिओवर मजेशीर कमेंटही करत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: