• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO: अचानक नवरी-नवरेदवाला आठवला कपड्यांना लावलेला माईक अन्..; पुढे जे घडलं ते पाहून आवरणार नाही हसू

VIDEO: अचानक नवरी-नवरेदवाला आठवला कपड्यांना लावलेला माईक अन्..; पुढे जे घडलं ते पाहून आवरणार नाही हसू

व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरदेव (Groom) आणि नवरी (Bride) एकमेकांसोबत बोलत आहेत. मात्र, अचानक त्यांच्या लक्षात येतं, की त्यांच्या कपड्यांना माईक लावले गेले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली 28 जून : सोशल मीडियावर (Social Media) आजकाल लग्नसमारंभातील अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral) झाल्याचं पाहायला मिळतं. काही व्हिडिओ तर इतके विनोदी (Funny Video) असतात की लोक हे व्हिडिओ वारंवार पाहत राहतात. तर, काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. या व्हिडिओवर लोक निरनिराळ्या कमेंट करत असतात. असाच आणखी एक व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाली हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. 18 व्या वर्षी पतीनं सोडलं; घरच्यांनी काढलं बाहेर, महिला पोलिसाची प्रेरणादायी कथा अनेकदा आपण लग्नातील वेगवेगळ्या घटनांचे विनोदी आणि कधी कधी धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहातो. इन्स्टाग्रामवर सध्या एक असाच विनोदी व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरदेव आणि नवरी एकमेकांसोबत बोलत आहेत. मात्र, अचानक त्यांच्या लक्षात येतं, की त्यांच्या कपड्यांना माईक लावले गेले आहेत. नवरदेवाला नवरी ही गोष्ट सांगते, तेव्हा तो प्रतिक्रिया देतो, की माईक ऑन असला म्हणून काय झालं? यानंतर सगळं काही नॉर्मल असल्याचं दाखवण्यासाठी तो गाणं म्हणायला सुरुवात करतो.
  चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला; बाटलीभर दारुसाठी तरुणीला 61 हजारांचा गंडा या दोघांच्या बाँडिंगला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. याच कारणामुळे अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं म्हटलं, की दोघांमधील केमिस्ट्री जबरदस्त आहे. दुसऱ्या एका युजरनं म्हटलं, की नवरदेव समजूतदार वाटतोय. याशिवाय इतरही अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि या जोडीचं नेटकरी कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ Witty Wedding नावाच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. ही बातमी देईपर्यंत व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: