मुंबई, 24 जानेवारी: आतापर्यंत आपण जंगलाचा राजा एकटा फिरताना अनेकवेळा पाहिलं आहे. मात्र त्याच्या साथीदारांसोबत फिरत असल्याचं दुर्मीळ दृश्यं सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकता अनेक सिंह मिळून एकत्र रस्त्यावरून मुक्त संचार करत आहेत. त्यांच्यामुळे रस्त्यावरची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. हे सिंह शांतपणे जात असल्याचं या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता.
9 सेकंदाचा हा व्हिडिओ इंडियन फॉरेस्ट सर्विस ऑफिसर सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एकटा फिरणारा जंगलाचा राजा चक्क अनेक साथीदारांना घेऊन रस्त्यावरून चालत असल्याचं दृश्य पाहायला मिळालं.
हा व्हिडिओ एडिट केल्याचा काही नेटकऱ्यांनी दावा केला आहे. त्यावर सुशांत नंदा यांनी प्रत्युत्तर दिलं. 45 सेकंदाचा संपूर्ण व्हिडिओ आहे. या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्यामध्ये अनेक सिंह आणि सिंहीण एकत्र रस्त्यावरून जात आहेत. रस्त्यावर कारमध्ये असलेल्या एका तरुणाच्या कॅमेऱ्यात हे दुर्मीळ दृश्य कैद झालं आहे. या व्हिडिओत कारमध्ये काय आहे याचं कुतूहल म्हणून त्यातला एक सिंह कारजवळ येतो कारकडे पाहून पुन्हा आपल्या वाटेनं चालू लागतो. ही दृश्यं साऊथ आफ्रिकेतील असल्याचं सांगितलं जात आहे.
13 हजारहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहण्यात आला आहे तर साडे तीनशेहून अधिक या व्हिडिओवर कमेंट करण्यात आल्या आहेत. हा व्हिडिओ ग्राफिक्सद्वारे एडिट करण्यात आल्याचं काही युझर्सनी म्हटलं आहे. मात्र अत्यंत दुर्मीळ असणारी हे दृश्य भारतातील नसल्याचं सुशांत यांनी सांगितलं.