नवी दिल्ली 05 जुलै : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ अनेकदा व्हायरल (Viral Animal Videos) झाल्याचं पाहायला मिळतं. प्राण्यांसंबंधीचा कंटेट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या कंटेटपैकी एक आहे. प्राण्यांची आवड असणारे कित्येक जण जंगालांमध्ये आपला वेळ घालवताना दिसतात. जेणेकरून त्यांना एक चांगला फोटो (Wildlife Photography) क्लिक करता येईल. अनेकदा जनावरांच्या जीवनशैलीबद्दलही माणसांच्या मनात अनेक सवाल असतात. हे अंघोळ कशी करत असतील किंवा कसे बोलत असतील, असे प्रश्न अनेकांना असतात. मात्र, इंटरनेटवर केवळ या प्रश्नांची उत्तरंच नाही तर व्हिडिओदेखील उपलब्ध आहेत.
उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग; हा VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'इतकी कसली घाई'?
सध्या सोशल मीडियावर एका कुत्र्याचा (Dog) व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात हा श्वान स्विमिंग पुलमध्ये (Swimming Pool) अंघोळ करताना दिसत आहे. हा कुत्रा आधी पुलाच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवर चढतो आणि नंतर स्विमिंग पुलमध्ये उडी घेतो. व्हिडिओमध्ये कुत्रा आरामात स्विमिंग पुलमध्ये पोहताना आणि अंघोळीची मजा घेताना दिसतो. हा व्हिडिओ तुमच्याही नक्की पसंतीस पडेल.
नागिन डान्सनंतर बंदूक डान्सचा धुमाकूळ; पाहा तरुणाच्या जबरदस्त स्टेप्सचा Video
हा व्हिडिओ reddit वर r/aww नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. लोक हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. बहुतेकांचं असं म्हणणं आहे, की त्यांनी पहिल्यांदाच एका कुत्र्याला स्विमिंग पुलमध्ये अशाप्रकारे अंघोळ करताना पाहिलं. हा क्यूट व्हिडिओ पाहून तुमचाही दिवस चांगला जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Video viral