Home /News /viral /

नागिन डान्सनंतर आता बंदूक डान्सचा धुमाकूळ; तरुणाच्या जबरदस्त स्टेप्समुळे Video Trending

नागिन डान्सनंतर आता बंदूक डान्सचा धुमाकूळ; तरुणाच्या जबरदस्त स्टेप्समुळे Video Trending

सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून लोक मजा घेत आहेत. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती असा डान्स (Dance Video) करताना दिसतो, की सगळेच हैराण होतात.

  नवी दिल्ली 04 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) दररोज निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्याचं पाहायला मिळतं. काही व्हिडिओ इतके भावनिक (Emotional Video) असतात की ते पाहूनच डोळ्यात पाणी येतं. तर, काही व्हिडिओ असे असतात जे पाहून हसू आवरणंही शक्य होत नाही. सध्या असाच एक व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्ही हसू आवरू शकणार नाही. व्हिडिओमधील डान्स (Funny Dance Video) करणाऱ्या तरुणाच्या डान्स स्टेप पाहून तुम्ही त्याला क्लास घेण्याचा सल्ला द्याल. बापरे! दंश करताना विंचू कसं सोडतो विष? पाहा हैराण करणारा VIDEO सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून लोक मजा घेत आहेत. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती असा डान्स करताना दिसतो, की सगळेच हैराण होतात. या तरुणाच्या डान्सनं असा धमाका केला आहे, की लोकं पाहातच राहिले. एका पार्टी डान्स करत असलेल्या या युवकाच्या डान्स स्टेप सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहेत. हा व्यक्ती इतका फनी डान्स करत आहे की लोक खळखळून हसण्यासोबतच व्हिडिओ शेअरही करत आहेत.
  VIDEO : खरी मैत्री; भुकेल्या बकरीच्या मदतीला धावून आला कुत्रा, बाटलीनं पाजलं दूध इन्स्टाग्रामवर giedde नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा व्यक्ती कशाप्रकारे जमिनीवर झोपून डान्स करत आहे. तर, मध्येच तो आपल्या चप्पलला बंदुक बनवून समोरच्यावर गोळ्या झाडताना दिसत आहे. हा डान्स व्हिडिओ इतका मजेशीर आहे की तो पाहून तुमचाही सगळा कंटाळा निघून जाईल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक व्हिडिओ शेअर करण्यासोबत यावर वेगवेगळ्या कमेंटही करत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Dance video, Social media viral

  पुढील बातम्या