जाहिरात
मराठी बातम्या / Viral / “उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग”; लग्नातला हा VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'इतकी कसली घाई'?

“उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग”; लग्नातला हा VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'इतकी कसली घाई'?

“उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग”; लग्नातला हा VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'इतकी कसली घाई'?

व्हिडिओमध्ये एक नवरदेव (Funny Video of Groom) घोड्यावर बसून हातात छत्री पकडून आपल्या नवरीबाईला आणण्यासाठी जात असल्याचं दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 05 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा मजेशीर व्हिडिओ (Funny Video) व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. यातील काही व्हिडिओ खळखळून हसवणारे तर काही हैराण करणारे असतात. तर, काही व्हिडिओ पाहून आपलाच त्यावर विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कारण, या व्हिडिओमध्ये एक नवरदेव (Funny Video of Groom) घोड्यावर बसून हातात छत्री पकडून आपल्या नवरीबाईला आणण्यासाठी जात असल्याचं दिसत आहे. नागिन डान्सनंतर बंदूक डान्सचा धुमाकूळ; पाहा तरुणाच्या जबरदस्त स्टेप्सचा Video कोरोना महामारीमुळे अनेकांची लग्नं पुढे ढकलण्यात आली. अशात सरकारनं आता लग्नासाठी काही नियमांसह परवानगी दिली असल्यानं बऱ्याच जणांनी या काळात घाईघाईनं लग्नगाठ बांधली आहे. अशात आता समोर आलेला व्हिडिओ (Wedding Video) पाहून नेटकरीही म्हणत आहेत, की बहुतेक नवरदेवाला लग्नाची जास्तच घाई झाली होती.

जाहिरात

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक नवरदेव पावसातच हातात छत्री पकडून आणि घोड्यावर बसून आपल्या नवरीला घेऊन जाण्यासाठी निघाला आहे. इतकंच नाही तर नातेवाईकही पावसात भिजत नवरदेवाच्या मागे-मागे जात आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याच कारणामुळे अनेकांनी यावर आपली प्रतिक्रियाही दिली आहे. FB वरील प्रियकरासाठी महिलेनं घेतला बाळाचा जीव; फेक अकाउंटमुळे 3 आयुष्य उद्धवस्त एका यूजरनं म्हटलं, की हे दृश्य खरंच फार विनोदी आहे. इतरही अनेक यूजर्सनं या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ निरंजन महापात्रा नावाच्या यूजरनं शेअर केला आहे. ही बातमी देईपर्यंत व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहेत. तर, अनेकांनी हा व्हिडिओ शेअरदेखील केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात