Home /News /viral /

अजबच! चक्क कुत्रा चालवतोय सायकल; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक

अजबच! चक्क कुत्रा चालवतोय सायकल; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक

सोशल मीडियावर सध्या एका कुत्र्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा सायकल चालवताना दिसत आहे.

  नवी दिल्ली 31 जुलै : प्राण्यांची विशेष आवड असणारे लोकं अनेकदा त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर करताना दिसतात. आपण सर्वांनी माकड, मांजर आणि कुत्रा अशा प्राण्यांचे डान्स व्हिडिओ (Dance Videos of Animals) इंटरनेटवर अनेकदा पाहिले असतील. ट्रेनिंगनंतर परफॉर्म करणाऱ्या अशा प्राण्यांचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मात्र, तुम्ही कधी कुत्र्याला सायकल चालवताना पाहिलंय का? बहुतेक लोकांचं उत्तर नाही, असंच असेल. कारण सायकल ही आपण शक्यतो माणसांनीच चालवताना पाहिली आहे. त्यामुळे, कुत्रा सायकल कशी चालवेल, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. मात्र, सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Dog Riding Bicycle) होत आहे. VIDEO: वरात घेऊन दारात आलेल्या नवरदेवावरच नवरी फेकू लागली तांदूळ; समोर आलं कारण सोशल मीडियावर प्राण्यांचे लाखो फोटो आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत. प्राण्यांचे काही व्हिडिओ आणि फोटो इतके खास असतात की ते पाहून आपल्याला हसू आवरत नाही. सोशल मीडियावर सध्या एका कुत्र्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा सायकल चालवताना दिसत आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की चार पाय असणारा कुत्रा सायकल कशी चालवू शकेल. मात्र, ट्रेनिंग मिळाल्यास हे प्राणी काहीही करू शकतात.
  ...अन् रात्री त्याच्या शेजारी येऊन झोपले 3 हिंस्त्र चित्ते; थरकाप उडवणारा VIDEO सायकल चालवणाऱ्या या कुत्र्याचा व्हिडिओ animals_dose नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडिओमध्ये एक सायकल चालवत आहे. तो सायकलिंगमध्ये किती ट्रेंड आहे, याची कल्पना हा व्हिडिओ पाहून येते. कारण तो अगदी अवघड रस्त्यावरुनही न डगमगता सायकल चालवत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. बहुतेकांनी असं म्हटलं आहे, की त्यांनी पहिल्यांदाच कुत्र्याला सायकल चालवताना पाहिलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Dog, Video viral

  पुढील बातम्या