नवी दिल्ली 31 जुलै : अनेक लोकांना प्राण्यांची विशेष आवड किंवा जिव्हाळा असतो. अनेकजण तर पाळीव प्राण्यांना (Pet Animals) घरातील एखाद्या सदस्याप्रमाणे ठेवतात. तर, हे प्राणीही आपल्या मालकावर विशेष प्रेम करतात. मात्र, सध्या व्हायरल (Shocking Video Viral) होत असलेला एक व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चित्त्यासोबत (Cheetah) झोपल्याचं पाहायला मिळतं. तेही एक नव्हे तर तीन चित्ते त्याच्या बाजूला झोपले आहेत.
50 वर्षांची स्त्री आणि 31 वर्षांच्या तरुणाला समजत होते आई-मुलगा; मात्र हे तर...
एखादा प्राणी कितीही भीतीदायक किंवा धोकादायक असला तरीही त्याला प्रेम दिल्यास तोदेखील तुमच्यासोबत प्रामाणिकच राहतो. इंटरनेटवर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यात दिसतं, की वाघ, सिंह आणि चित्ता यांसारखे प्राणीदेखील माणसाचे जवळचे मित्र असतात. असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती तीन चित्त्यांसोबत झोपलेला दिसतो. यातील एका चित्त्याला जास्त थंडी वाजल्यानं तो या व्यक्तीच्या जवळ जात त्याच्याचसोबत झोपतो. यानंतर दुसरा चित्ताही उठून मालकाजवळ येतो आणि त्याच्या पायाजवळ जाऊन झोपतो. यानंतर शेवटी तिसरा चित्तादेखील उठून आपल्या मालकाजवळ येऊन झोपतो.
View this post on Instagram
पाहता पाहता पत्त्यांसारखा दरीत कोसळला भला मोठा ट्रक; Shocking Video
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ प्रसिद्ध कलाकार सुनील ग्रोवरनं (Sunil Grover) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. व्हिडिओ आतापर्यंत 1.5 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोक हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत.चित्त्यांची आणि माणसाची ही घनिष्ट मैत्री पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking viral video, Wild animal