Home /News /viral /

VIDEO: अरेच्चा! वरात घेऊन दारात आलेल्या नवरदेवावरच नवरी फेकू लागली तांदूळ; समोर आलं कारण

VIDEO: अरेच्चा! वरात घेऊन दारात आलेल्या नवरदेवावरच नवरी फेकू लागली तांदूळ; समोर आलं कारण

व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरदेव आपल्या सासरी पोहोचतो मात्र यानंतर नवरीबाई नवरदेवावर (Bride and Groom Video) तांदूळ फेकून त्याचं स्वागत करते.

  नवी दिल्ली 31 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) लग्नसमारंभातील व्हिडिओ (Wedding Video) मागील काही दिवसांपासून चांगलेच व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतं. हे व्हिडिओ नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरतात. यातील काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की ते आपला दिवसच चांगला बनवतात. सध्या असाच एक व्हि़डिओ चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. चोर बाजारातून घेतला 90 पैशांचा तुटका चमचा, लाखोंची बोली लागल्याने बदललं नशीब! आपल्या सर्वांना माहिती आहे की सासरी पोहोचताच नवरदेवाचं मोठ्या थाटात स्वागत केलं जातं. मात्र, अनेकदा याचवेळी असं काही घडतं की पाहणारे लोकंही विचारात पडतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरदेव आपल्या सासरी पोहोचतो मात्र यानंतर नवरीबाई नवरदेवावर (Bride and Groom Video) तांदूळ फेकून त्याचं स्वागत करते. नवरीची उंची कमी असल्यानं तिच्या वडिलांनी तिला उचलून घेतलं आहे. तर, नवरदेवही आपल्या होणाऱ्या पत्नीच्या अंगावर तांदूळ फेकत आहे.
  पाहता पाहता पत्त्यांसारखा दरीत कोसळला भला मोठा ट्रक; Shocking Video हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंतीही मिळत आहे. याच कारणामुळे अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, की लग्नातील अशी प्रथा मी पहिल्यांदाच पाहिली. तर आणखी एकानं कमेंट करत म्हटलं, की हे लग्न आहे की युद्ध. बातमी देईपर्यंत 15 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. आदर्श सेजल नावाच्या यूजरनं हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Viral video on social media, Viral videos, Wedding video

  पुढील बातम्या