जाहिरात
मराठी बातम्या / Viral / गर्दीच्या ठिकाणीच अचानक रस्ता खचला अन् वाहनांसह अख्खा बाजार जमिनीत सामावला, Shocking Video

गर्दीच्या ठिकाणीच अचानक रस्ता खचला अन् वाहनांसह अख्खा बाजार जमिनीत सामावला, Shocking Video

गर्दीच्या ठिकाणीच अचानक रस्ता खचला अन् वाहनांसह अख्खा बाजार जमिनीत सामावला, Shocking Video

हा रस्ता नाल्याच्या वर बांधण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना घडली त्यावेळी रस्त्यावर बाजारपेठ होती. याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक भाजी खरेदीसाठी येतात.

  • -MIN READ Hyderabad,Telangana
  • Last Updated :

हैदराबाद 24 डिसेंबर : हैदराबादच्या गोशामहल परिसरात शुक्रवारी रस्ता खचल्याने अपघात झाला. अपघाताच्या वेळी याठिकाणी बाजारही भरलेला होता. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी होती. अपघातानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नसलं तरी त्याठिकाणी उभा असलेली अनेक वाहनं आणि हातगाड्या रस्त्यासोबतच खड्ड्यात कोसळल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जीएचएमसीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. स्टेजवर कोसळला अन् काही सेकंदातच गेला कलाकाराचा जीव; मृत्यूचा हृदय पिळवटून टाकणारा Live Video हा रस्ता नाल्याच्या वर बांधण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना घडली त्यावेळी रस्त्यावर बाजारपेठ होती. याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक भाजी खरेदीसाठी येतात. इथे लोकांनी गाड्यांवर भाजीपाला वगैरे टाकला होता. रस्ता अचानक खचल्याने हातगाड्यांसह लोकही खड्ड्यात पडले. ज्यांना स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र भाजी विक्रेत्यांचे मात्र निश्चितच नुकसान झाले आहे. या घटनेबाबत नागरिकांमध्ये संतापासह घबराट पसरली आहे.

गोशामहलचे आमदार राजा सिंह यांनी माहिती देताना सांगितलं की, हा पूल 2009 मध्ये काँग्रेसच्या काळात बांधण्यात आला होता. हा भ्रष्टाचार आहे, कारण नाल्यावरील पुलाच्या बांधकामात निकृष्ट लोखंडाचा वापर करण्यात आला. दुसरीकडे शाहिनाथगंजचे पोलीस निरीक्षक अजय कुमार यांनी सांगितलं की, ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. ज्यामध्ये एक जण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बापरे..! जखमी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी अ‍ॅम्ब्युलन्स चालकाने पाजली दारू व्हिडिओमध्ये दिसत आहे की किती फूट लांबीचा रस्ता जमिनीत कशाप्रकारे खचला आहे. अनेक वाहनेही रस्त्याच्या आतील भागात पडली असून रस्त्यावर ठेवलेल्या भाजीपाल्याची पोतीही जमिनीत साचली आहेत. त्यामुळे भाजी विक्रेत्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्याचवेळी वाहनांचेही नुकसान झाले असून पोलीस क्रेनच्या साहाय्याने त्यांना बाहेर काढत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात