जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे..! जखमी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी अ‍ॅम्ब्युलन्स चालकाने पाजली दारू

बापरे..! जखमी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी अ‍ॅम्ब्युलन्स चालकाने पाजली दारू

रुग्णवाहिका

रुग्णवाहिका

या प्रकरणी चालकाने स्पष्टीकरण दिलंय. तो म्हणाला की, रुग्णाने स्वतः दारू पिण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे मी त्याला दारू पाजली.

  • -MIN READ Trending Desk Odisha
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 डिसेंबर : स्ट्रेचरवर पडलेल्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी अ‍ॅम्ब्युलन्स चालकाने दारू पाजल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. एका अ‍ॅम्ब्युलन्स चालकाने रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना रस्त्यात अ‍ॅम्ब्युलन्स थांबवून दारू प्यायली. एवढंच नाही तर त्याने जखमी रुग्णाला दारू पिण्याची ऑफर दिली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अ‍ॅम्ब्युलन्स चालक स्वत:साठी आणि रुग्णासाठी पेग बनवताना दिसत आहे. स्ट्रेचरवर एका पायावर प्लॅस्टर असलेला रुग्ण हळूहळू दारू पिताना दिसत आहे. या वेळी त्या ठिकाणी उपस्थित लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. टीव्ही 9 ने याबाबत वृत्त दिलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे चालक आणि रुग्णाचा हा दारू पिण्याचा प्रकार जेव्हा घडला, तेव्हा एक महिला आणि एक लहान मूलही या अ‍ॅम्ब्युलन्समधून प्रवास करत होते. या प्रकरणी चालकाने स्पष्टीकरण दिलंय. तो म्हणाला की, रुग्णाने स्वतः दारू पिण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे मी त्याला दारू पाजली. दरम्यान, या प्रकरणावर जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ही अ‍ॅम्ब्युलन्स खासगी आहे, त्यामुळे आम्ही त्यावर कारवाई करू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं. या प्रकरणी पोलीस आणि आरटीओने दखल घेऊन कारवाई करावी, असे ते म्हणाले.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, या प्रकरणी परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अ‍ॅम्ब्युलन्स चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. दुसरीकडे, या प्रकरणी तीर्थोल पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक जुगल किशोर दास यांनी सांगितलं की, या प्रकाराबद्दल कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे एफआयआर नोंदवल्यानंतरच तपास सुरू केला जाईल. मद्यपान करून गाडी चालवणं हा गुन्हा मानला जातो, म्हणून आरोपींवर कडक कारवाई केली जाईल. हे संपूर्ण प्रकरण ओडिशातील जगतसिंगपूरमध्ये घडलं आहे. हे वाचा -  हे छोटे बदल केल्याने हिवाळ्यातही घर राहील गरम; रूम हिटरची पडणार नाही गरज मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांपूर्वी दिल्लीतून एक असाच व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये मद्यधुंद अधिकारी कार चालवत होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्या अधिकाऱ्याने माफी मागितली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर संतप्त लोकांनी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती. मात्र, पोलिसांना या प्रकरणी कोणीही तक्रार दिली नव्हती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात