बंगळुरू 24 डिसेंबर : गेल्या काही महिन्यांत हृदयविकाराच्या झटक्याने नाचताना आणि गाताना लोकांचा अचानक मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या घटना आता थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. नुकतंच असंच एक ताजं प्रकरण कर्नाटकातील मंगळुरूमधून समोर आलं आहे. इथेही स्टेजवरच एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्यानेच या व्यक्तीचाही मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. मंगळुरू येथील कटेलु सरस्वती सदन येथे त्रिजन्म मोक्ष यक्षगान आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये 58 वर्षीय गुरुवप्पा बयारू हे शिशुपालाची भूमिका करत होते. दरम्यान, बयारू अचानक स्टेजवरून खाली पडले. त्यांना तातडीने मंगळुरू येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. इथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गुरुवप्पा हे श्री दुर्गापरमेश्वरी कृपापोषित यक्षगान मंडळातील कलाकार होते. बापरे..! जखमी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी अॅम्ब्युलन्स चालकाने पाजली दारू स्टेजवर हृदयविकाराचा झटका येण्याची ही पहिलीच घटना नाही, ज्यामुळे लोक हैराण झाले आहेत. याआधी मध्य प्रदेशातील येथे 12 वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. या घटनेबाबत डॉक्टरांचं मत होतं की, एवढ्या लहान वयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची राज्यातील ही पहिलीच घटना असू शकते.
कर्नाटक: स्टेजवरच एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्यानेच या व्यक्तीचाही मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. pic.twitter.com/W0o1SFw6SQ
— News18Lokmat (@News18lokmat) December 24, 2022
मुलाच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, 12 वर्षीय मनीष जाटव हा चौथ्या वर्गात शिकत होता. तो भावासोबत इटावा रोडवर असलेल्या शाळेत शिकण्यासाठी गेला होता. त्याने शाळेत दुपारचे जेवण केलं. यानंतर घरी परतण्यासाठी 2 वाजता स्कूल बसमध्ये चढला. यादरम्यान त्याला चक्कर आली आणि तो बसमध्ये पडला. याबाबतची माहिती बस चालकाने शाळा व्यवस्थापनाला दिल्याचे नातेवाईकांनी सांगितले. यानंतर मुलाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, तेथे डॉक्टर त्याला वाचवण्यात अपयशी ठरले. खोकता खोकता महिलेची 4 हाडचं मोडली; कारण वाचून धक्काच बसेल! राज्यातीलच आणखी एका घटनेत सिवनी येथे लग्नसोहळ्यापूर्वी संगीताचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी नाचत असतानाच एक महिला अचानक खाली कोसळली. तिला रुग्णालयात नेलं असता हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका अल्पवयीन मुलाला शिंकताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.