मराठी बातम्या /बातम्या /Viral /MBBS डॉक्टरचा चहावाल्यावर जडला जीव, लग्नही केलं; तिनं त्याच्यात काय पाहिलं? कसं जुळलं? पाहा हा Love Story Video

MBBS डॉक्टरचा चहावाल्यावर जडला जीव, लग्नही केलं; तिनं त्याच्यात काय पाहिलं? कसं जुळलं? पाहा हा Love Story Video

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

काही दिवसांतच व्हॅलेंटाइन डे येतो आहे. त्याच पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि चहावाल्याची ही अनोखी लव्ह स्टोरी.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

कराची, 01 फेब्रुवारी :  सामान्यपणे लग्न म्हटलं की आपल्या तोलामोलाचा जोडीदार शोधला जातो किंवा निवडला जातो. म्हणजे आपल्या आयुष्याचा जोडीदाराचं आपल्या इतकं शिक्षण असावं, आपण कमावतो तितकंच त्यानेही कमावयाला हवं, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. त्यात ती महिला असेल तर तिला आपला जोडीदार आपल्यापेक्षा जास्त शिकलेला आणि जास्त पैसे कमावणाराच हवा असतो. असं असताना पाकिस्तानातील एक असं कपल चर्चेत आलं आहे, ज्याने प्रेम असेल तर या कशाचीच गरज नाही, प्रेमासमोर हे सर्वकाही क्षुल्लक आहे हे दाखवून दिलं आहे. एका एमबीबीएस डॉक्टर महिलेने चक्क एका चहावाल्याशी लग्न केलं आहे. व्हॅलेटाइन डेच्या पार्श्वभूमीवर ही अनोखी लव्ह स्टोरी तुमच्यासाठी.

डॉक्टर किश्वर आणि चहावाला शाहाजाद. ओकारातील दीपालपूरमध्ये राहणारं हे कपल. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नही केलं. त्यांनी सर्वांना आपल्या अजब प्रेमाची गजब कहाणी सांगितली आहे.

डॉक्टर किश्वर ज्या रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत होती, तिथं शहजाद चहावाला म्हणून आणि साफसफाईचं काम करायचा.  डॉ. किश्वरने एकदा शहजादचा फोन नंबर मागितला आणि दोघांमध्ये बोलणं होऊ लागलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एमबीबीएससारखं उच्च शिक्षण घेणाऱ्या डॉ. किश्वरनेच शहजादला प्रपोज केलं.

हे वाचा - प्रेम व्यक्त करा पण जरा सांभाळूनच! प्रपोज करायला गेलेल्या तरुणासोबत धक्कादायक घडलं; पाहा VIDEO

एक दिवस शहजादला तिने आपल्या रूममध्ये बोलावलं आपलं प्रेम व्यक्त केलं. डॉक्टर असलेल्या किश्वरने प्रपोज केल्याने शहजादलाही धक्का बसला. त्याला तापही आला होता. पण त्यालाही ती आवडत होती. त्यामुळे अखेर त्या दोघांनी लग्न केलं.

डॉक्टर किश्वर आपल्या नवरा शहजादचं खूप कौतुक करते. ती सांगते, "शहजाद आपल्याला क्लिनर किंवा चहावाला वाटत नाही. त्याच्या वागणुकीवर मी फिदा झाले". तर शाहजादला म्हणतो, "डॉ. किश्वर त्याला खूप खूप सुंदर वाटायची. पण ती आपल्या प्रेमात पडेल, आपल्याशी लग्न करेल असा विचारही मी कधी केला नव्हता. पण नशीबात जे लिहिलं होतं, ते घडलं"

हे वाचा - मानलं राव या प्रेमवीराला! GF ला असं प्रपोज केलं की अख्खा जग पाहत राहिला; Watch Video

आता डॉक्टर आणि चहावाल्याचं लग्न हे अनेकांच्या पचनी न पडणारं आहे. त्यामुळे लग्नानंतर किश्वरला रुग्णालयातील नोकरी सोडावी लागली, कारण त्यांना समाजाकडून खूप ऐकावं लागायचं. आता ते स्वतःचं क्लिनिक खोलण्याचा विचार करत आहेत. दरम्यान त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांना अनेकांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

" isDesktop="true" id="823733" >

मेरा पाकिस्तान या युट्यूब चॅनेलवर एक वर्षभरापूर्वी कपलचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

First published:

Tags: Couple, Lifestyle, Love story, Relationship, Valentine Day