मराठी बातम्या /बातम्या /Viral /प्रेम व्यक्त करा पण जरा सांभाळूनच! प्रपोज करायला गेलेल्या तरुणासोबत धक्कादायक घडलं; पाहा VIDEO

प्रेम व्यक्त करा पण जरा सांभाळूनच! प्रपोज करायला गेलेल्या तरुणासोबत धक्कादायक घडलं; पाहा VIDEO

एका तरुणाला प्रपोज करणं किती महागात पडलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

एका तरुणाला प्रपोज करणं किती महागात पडलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

एका तरुणाला प्रपोज करणं किती महागात पडलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

 मुंबई, 01 फेब्रुवारी : व्हॅलेंटाइन डे जवळ येतो आहे. कित्येकांनी तर आता त्याची तयारीही सुरू केली असेल. जे एकमेकांच्या प्रेमात आधीपासूनच आहेत, ते आपला व्हॅलेंटाइन डे खास बनवण्याच्या तयारीत, तर जे व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्त साधत प्रेमाचा शुभारंभ करणार असतील ते हटके पद्धतीने आपलं प्रेम व्यक्त करण्याच्या तयारीत. पण प्रेम व्यक्त करताना काळजी घ्या. नाहीतर हे प्रेम तुम्हाला चांगलंच महागात पडेल. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

बऱ्याचदा आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करत आहोत. ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करते की नाही हे आपल्याला माहिती नसते. काही वेळा ती व्यक्तीही आपल्यावर प्रेम करते असं वाटतं. पण तसं नसतं आणि मग आपण आपलं प्रेम व्यक्त करतो आणि त्याचा परिणाम उलटा होतो. असाच हा व्हिडीओ आहे. ज्यात एक तरुण एका मुलीसमोर आपलं प्रेम व्यक्त करायला गेला पण त्याच्यासोबत धक्कादायक घडलं.

हे वाचा - मानलं राव या प्रेमवीराला! GF ला असं प्रपोज केलं की अख्खा जग पाहत राहिला; Watch Video

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता विद्यार्थिनींचा एक ग्रुप आहे. जो एका तरुणाला मारहाण करतो आहे. तिथं इतर काही लोकही आहेत. जे या तरुणाला मारहाण करत आहेत. तरुण पळण्याचा प्रयत्न करतो पण त्याला पळू दिलं जात नाही आहे. त्याची चांगलीच पिटाई केली जाते आहे. तरुण मोठमोठ्याने ओरडतो आहे, रडतो आहे, हात जोडून आपल्याला सोडून देण्याची विनवणी करतो आहे. पण मुली त्याला बिलकुल माफ करत नाही. त्या त्याची चांगलीच धुलाई करतात. त्याला जमिनीवर आपटून, केस खेचून मारतात.

हे वाचा - मिशन Valentine's Day! GF साठी BF असं काही करतोय की VIDEO पाहून तुम्हीही व्हाल थक्क

तिथंच उपस्थित असलेल्या कुणीतरी हा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. अरहंत शेल्बी नावाच्या युझरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या तरुणीने जी चूक केली ती चूक तुम्ही करून नका. प्रेमात वेडे होऊन घाईघाईत काहीही करायला जाऊ नका. नाहीतर आज या तरुणासोबत जे घडलं ते उद्या तुमच्यासोबतही घडू शकतं.

First published:

Tags: Valentine Day, Viral, Viral videos