मराठी बातम्या /बातम्या /Viral /मानलं राव या प्रेमवीराला! GF ला असं प्रपोज केलं की अख्खा जग पाहत राहिला; Watch Video

मानलं राव या प्रेमवीराला! GF ला असं प्रपोज केलं की अख्खा जग पाहत राहिला; Watch Video

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

या कपलच्या प्रपोजचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 31 जानेवारी : आता व्हॅलेंटाइन डे जवळ येतो आहे. त्यामुळे बरेच जण हा व्हॅलेंटाइन डे खास करण्यासाठी हटके पद्धतीने प्रपोज करण्यासाठी आणि अनोखं गिफ्ट यासाठी आयडिया शोधत असतील. याचदरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात एका बॉयफ्रेंडनं आपल्या गर्लफ्रेंडसाठी असं काही केलं आहे, की अख्खं जग पाहत राहिला आहे.

प्रेम आंधळं असतं, प्रेमात व्यक्ती काहीही करू शकते, हे तुम्हाला माहितीच आहे. बरेच जण प्रेमात तुला आकाशातील चंद्र-तारे आणून देईन असंही म्हणतात. प्रत्यक्षात तर ते शक्य नाही हे सर्वांनाच माहिती आहे. पण तरी काही लोक आपल्या जोडीदारासाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करत असतात. हेच या तरुणानेही केलं. इन्स्टाग्राम युझर दिव्यदीप भटनागरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्याने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी काही तरी वेगळं करायचं होतं. असं व्हिडीओच्या सुरुवातीला म्हटलं आहे.

हे वाचा - मिशन Valentine's Day! GF साठी BF असं काही करतोय की VIDEO पाहून तुम्हीही व्हाल थक्क

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता हा तरुण बेल्जिअमच्या अँटवर्पमध्ये जाताना दिसतो आहे. अँटवर्प म्हणजे जगातील हिऱ्यांची राजधानी. हा तरुण गर्लफ्रेंडला प्रपोज कऱण्यासाठी रिंग खरेदी करायला म्हणून खास या हिऱ्यांच्या राजधानीत गेला. बेल्जिअममध्ये गेल्यानंतर त्याने तिथं रिंगबाबत रिसर्च केला आणि काही पर्याय बघून त्याने रिंग खरेदी केली. त्यानंतर तो घरी परतला.

पुढे तो एका हॉलमध्ये स्टेजवर दिसतो. जिथं काही मित्र त्याच्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत तो डान्सची प्रॅक्टिस करताना दिसतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्याने गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी अख्खं ऑडिटोरियम बुक केलं.  तिथंच खास डान्स परफॉर्म करून त्याने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं.

हे वाचा - 2 बायका फजिती ऐका! एक झाल्या सवती अन्...; नवऱ्याने विचारही केला नाही ते घडलं

व्हिडीओच्या शेवटी तो स्टेजवर गर्लफ्रेंडसमोर तो गुडघ्यावर बसलेला दिसतो. खरेदी केलेली  तिच रिंग देऊन प्रपोज करताना दिसतो. त्यावेळी त्याच्या गर्लफ्रेंडचा आनंद गगनात मावेनासा असतो. आपला आनंद व्यक्त करायला तिच्याकडे शब्दही नाहीत. आता असं कुणी प्रपोज केलं तर कोणती तरुणी नकार देईल बरं. ही तरुणीसुद्धा नकार देत नाही आणि लगेच त्याला मिठीच मारते.

तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आणि प्रेमाचा तुम्हाला असा काही हटके किस्सा माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

First published:

Tags: Boyfriend, Couple, Girlfriend, Relationship, Valentine day, Viral, Viral videos