मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - लिपस्टिकच्या क्वालिटीवर फिदा; 20 वर्षीय तरुणीने 60 वर्षांच्या कॉस्मेटिक विक्रेत्यासोबतच थाटला संसार

VIDEO - लिपस्टिकच्या क्वालिटीवर फिदा; 20 वर्षीय तरुणीने 60 वर्षांच्या कॉस्मेटिक विक्रेत्यासोबतच थाटला संसार

लिपस्टिकमुळे तरुणी वृद्धाच्या प्रेमात. (प्रतीकात्मक फोटो - सौजन्य - Canva)

लिपस्टिकमुळे तरुणी वृद्धाच्या प्रेमात. (प्रतीकात्मक फोटो - सौजन्य - Canva)

20 वर्षांची तरुणी आणि 60 वर्षांच्या व्यक्तीची कॉस्मेटिक शॉपवर सुरू झालेली लव्ह स्टोरी.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

कराची, 02 फेब्रुवारी :  सामान्यपणे तरुणींना मेकअप, कपडे याची आवड असते. त्यावेळी या गोष्टींची जास्त खरेदी करणारी तरुणी असेल तर तिला तू त्या दुकानदाराशीच लग्न कर, असं मस्करीत म्हटलं जातं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका तरुणीने खरंच तसं केलं आहे. कॉस्मेटिक शॉपमधून कॉस्मेटिक खरेदी करता करता ती त्या दुकानदाराच्याच प्रेमात पडली. इतकं की तिला वयाचंही भान राहिलं नाही आणि तिने त्याच्याशी लग्नही केलं. व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर कॉस्मेटिक्स शॉपवर सुरू झालेली ही अनोखी लव्ह स्टोरी.

हलकासा का होईना पण मेकअप हा बहुतेक महिलांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. किमान चेहऱ्याला पावडर, ओठाला लिपस्टिक आणि कपड्यांना परफ्युम तर असतोच असतो. हे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चांगल्या क्वालिटीचे असावे याकडेही लक्ष दिलं जातं. अशाच एका कॉस्मेटिक शॉपमधील मेकअप प्रोडक्ट्सच्या क्वालिटीवर एक तरुणी इतकी फिदा झाली की तिने त्या शॉपच्या दुकानदारालाच आपलं हृदय दिलं. 20 वर्षांची तरुणी 60 वर्षांच्या दुकानदाराच्या प्रेमात पडली आणि त्यांनी लग्नही केलं.

हे वाचा - MBBS डॉक्टरचा चहावाल्यावर जडला जीव, लग्नही केलं; तिनं त्याच्यात काय पाहिलं? कसं जुळलं? पाहा हा Love Story Video

60 वर्षांचा अशरफ ज्याचं कॉस्मेटिक शॉप आहे. 20 वर्षांची अंबर त्याच्या दुकानातून नेहमी कॉस्मेटिक प्रोडक्ट खरेदी करायची. लिपस्टिक, परफ्युम, काजळ, पावडर असं काही ना काही ती खरेदी करायला येत होती. इथल्या प्रोडक्ट्सची क्वालिटी तिला खूप आवडली. त्यामुळे ती नेहमी इथंच खरेदी करायची. त्यावेळी अंबर आणि अशरफ दोघांची चांगली ओळख झाली. दोघं एकमेकांशी बोलू लागले. अंबरला अशरफचं वागणंही आवडू लागलं. हळूहळू कॉस्मेटिक प्रोडक्ट्ससह अंबर अशरफच्याही प्रेमात पडली.

तुम्हाला आश्चर्य वाटेल अंबरनेच अशरफला सर्वात आधी प्रपोज केलं.  अशरफ तसा सिंगलच होता. भावंडांमध्ये तो सर्वात मोठा. त्यामुळे सर्वांची जबाबदारी पार पाडता पाडता तो आयुष्यात पुढे जायचंच विसरून गेला. त्याने लग्नही केलं नव्हतं. अशात अंबरने त्याच्या हृदयालाच हात घातला, त्याचं हृदय चोरलं. मग अशरफच्या मनातही प्रेम बहरू लागलं. अशरफच्याही मनातील भावना जागृत झाल्या आणि त्याचाही तिच्यावर जीव जडला.

हे वाचा - मानलं राव या प्रेमवीराला! GF ला असं प्रपोज केलं की अख्खा जग पाहत राहिला; Watch Video

दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी लग्न कऱण्यचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबाने याला विरोध केला. पण त्यांनी कुणाचंचं ऐकलं नाही.

" isDesktop="true" id="824463" >

Syed Basit Ali युट्यूब चॅनेलवर या कपलने आपली लव्ह स्टोरी सांगितली आहे. वयाच्या अंतराचा त्यांना काहीच फरक पडत नाही. कुटुंब, समाज काय विचार करतं, याची त्यांना पर्वा नाही. विरोध होऊन, अडचणी येऊनही त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही आणि अखेर दोघं लग्नबंधनात अडकले.

First published:

Tags: Couple, Love, Love story, Relationship, Valentine Day, Viral, Viral videos