मुंबई, 03 जून : अजगरानं मोराची शिकार केल्यानंतर आता हरणाला गिळंकृत केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचं कारण तेवढंच खास आहे. रस्त्यावर अजगर हरणाला गिळंकृत करत असताना तरुण मात्र मोठं धाडस दाखवून या हरणाचा जीव वाचवतो. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. अजगर आपली संपूर्ण ताकद वापरून या हरणाची शिकार करतो. त्याच वेळी तिथून जाणाऱ्या तरुणाला हे दृश्यं दिसतं हरणाची जगण्याची धडपड दिसते आणि मोठ्या धैर्यानं तरुण या हरणाचा जीव वाचवतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ विनीत वशिष्ट नावाच्या तरुणानं ट्वीट केला आहे.
What do you think? The man was right or wrong?#wildlife #wildlifephotography #jimcorbett #tuesdayvibes @NalinYadavIFS @SudhaRamenIFS @JamirShaikh_IFS @vikas_yadav_ifs @ParveenKaswan @s_singh_ifs @SmithamolMS @NatGeoIndia @NatGeoPhotos @susantananda3 pic.twitter.com/ZPmAJIjVNI
— Vineet Vashist (@_VineetVashist) June 2, 2020
हा व्हिडीओ आतापर्यंत 1 लाखहून अधिक युझर्सनी पाहिला आहे. तर 1 हजारहून अधिक जास्त लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की तरुण या हरणाला वाचवायला आल्यानंतर हा अजगर आपल्या शिकारीवरील पकड अधिक घट्ट करतो. तरुण एका झाडाच्या मदतीनं हरणाचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे पण अजगर त्यावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न करतो. अनेक युझर्सनी तरुणानं या दोघांच्या मध्ये पडणं चुकीचं असल्याचंही म्हटलं आहे. निसर्गात ज्या गोष्टी घडत असतात त्यांच्या विरुद्ध जाणं चुकीचं असल्याचं अनेक युझर्सनी म्हटलं आहे. संपादन- क्रांती कानेटकर