वादळापासून वाचण्यासाठी शेड पकडून उभा होता...#म #मराठी #CycloneNisarg #निसर्गचक्रीवादळ @HashTagMarathi pic.twitter.com/3zjDOcKryX
— Suraj Borawake (@s_borawake) June 3, 2020
I think its old video have you checked
— Nishant (@Nishant33438893) June 3, 2020
हा व्हिडीओ आतापर्यंत 3.7 हजार लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ जुना असल्याचा काही युझर्सनी दावा केला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यानं अनेक घरांचे पत्रे उडाले तर झाडं उन्मळून पडल्यानं अनेक भागांमधील वीज पुरवठाही खंडित झाला आहे. रत्नागिरी, पालघर, रागयगडमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली तर मुंबई- पुण्यात झाडं उन्मळून मोठं नुकसान झालं आहे. हे वाचा-वाऱ्यामुळे चालत्या गाडीवर कोसळला भला मोठा साइन बोर्ड; VIDEO VIRAL या चक्रीवादळात दोन जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ( nisarga cyclone) चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासात कोणतीही प्रगती झाली नसल्याचं निरीक्षण पुणे वेधशाळेनं नोंदवलं आहे. मान्सूनचा प्रवास हा आजवर खरंतर नियोजित वेळापञकानुसारच सुरू होता. पण काल अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने हवेतील सगळी आर्द्रता शोषून घेतल्याने मान्सूनच्या प्रवासात तात्पुरता अडथळा निर्माण झाला आहे. हे वाचा-निसर्गाचा प्रकोप टळला, पण मान्सून मात्र लांबला हे वाचा-Cyclone Nisarga मुंबई पुन्हा एकदा थोडक्यात वाचली; हे आहे कारण संपादन- क्रांती कानेटकरहा video आजचा आहे का? 😁
— अनिल (@anilgite021) June 3, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral video.