कटिहार, 06 जून : एका क्वारंटाइन सेंटरमध्ये प्रवाशांच्या आग्रहास्तव जेवण तयार करणाऱ्या तरुणानं तुफान डान्स केला आहे. प्रवाशांचं मनोरंजन आणि हसवण्यासाठी त्यानं हा डान्स केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बिहारच्या कटिहार इथल्या एका शाळेत मजुरांना आणि प्रवाशांना ठेवण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटरमधील असल्याची माहिती मिळत आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये आचारी म्हणून काम करणारा रिंकू प्रवासी मजुरांना भोजन देण्याबरोबरच आपल्या डान्समुळे प्रसिद्ध झाला आहे. मजुरांच्या आग्रहास्तव या रिंकूनं ‘एक चतुर नार’ या गाण्यावर तुफान डान्स केला. त्याच्या या डान्सला मजूर आणि प्रवाशांनीही भरभरून प्रतिसाद दिला. त्याच्या डान्स आणि अभिनयाचा व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.
ये वीडियो क्लिप, बिहार के कटिहार जिले के एक #कोरंटाइन सेंटर का है। बिहार के लोगों की उत्सवधर्मिता किसी से भी कम नहीं है। आश्चर्य होता है कि संकट के इस दौर में कोई व्यक्ति जीवन को इस अंदाज में भी जी सकता है। जिंदगी के प्रति अद्भुत रागात्मकता और जिजीविषा #बिहारी मानस की पहचान है। pic.twitter.com/PPnC9xP4YO
— डॉ. देवेंद्र तिवारी (Dr. Devendra Tiwari) (@idrdev) June 6, 2020
हे वाचा- निसर्ग चक्रीवादळामध्ये तुफान VIRAL होतोय हा VIDEO, पाहून पोट धरून हसाल क्वारंचाइन सेंटरमध्ये जेवण बनवणारा रिंकू एका लहान गावात हॉटेल चालवतो. रिंकू म्हणतो मला लहानपणापासून डान्स करण्याची खूप आवड आहे. कुणी आग्रह केला किंवा मला संधी मिळाली तर मी डान्स करतो. या व्हिडीओला आतापर्यंत 400 हून अधिक लोकांनी पाहिलं आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये आलेल्या प्रवासी आणि मजुरांना धीर देत त्यानं मनोरंजनही केलं आहे. रिंकू यांच्या डान्समुळे अनेकांना सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि ते लवकर बरे होतील असं युझर्सनी म्हटलं आहे. या तरुणाचा डान्सला युझर्सनी तुफान प्रतिसाद दिला आहे. हे वाचा- सरकारी अधिकाऱ्याला थेट चपलेने मारून विचारला जाब! भाजप महिला नेत्याचा VIDEO संपादन- क्रांती कानेटकर