मुंबई, 25 ऑगस्ट : बऱ्याच वेळा असं काही घडतं ज्याची आपण अपेक्षाही केलेली नसेल. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अवघ्या 23 सेकंदाच जे घडलं ते पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. रस्त्यावरून चालणाऱ्या चार गाड्या एकाच वेळी अचानक गायब झाला. रस्त्यावर असं काही घडलं की चारही गाड्या दिसेनाशा झाल्या. धडकी भरवणारा असा हा व्हिडीओ आहे.
व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर काही गाड्या आहेत. सुरुवातीला एक भलामोठा ट्रक दिसतो आहे. ट्रकमुळे मागील गाड्यांना पुढे जायला जागा नाही आहे. त्यामुळे जसा ट्रक पुढे सरकतो तशा मागील गाड्या हळूहळू मागे मागे येत आहेत. ट्रकच्या मागे एकूण चार कार रांगेत दिसत आहेत. इतक्यात मागून आणखी एक भलामोठा ट्रक येतो. हा ट्रक भरधाव असतो. तो वेगाने येतो आणि सर्व गाड्यांवर चढतो आणि या गाड्यांच्या पुढे असलेल्या ट्रकला तो टक्कर देणार तोच तो ट्रक पुढे निघून जातो.
ट्रक एकामागोएक चारही गाड्यांवरून जातो. त्यानंतर धुरळा उडतो आणि धूरच धूर दिसतो. रस्ता, गाड्या काहीच दिसत नाही. सर्वकाही गायब झाल्यासारखं वाटतं. काही वेळाने सर्वकाही स्पष्ट दिसू लागतं. गाड्या गायब झाल्यासारख्या होता. काही वेळाने जसा धुरळा कमी होतो तसं तुम्ही पाहू शकता की चारही कार गायब होतात. तिथं फक्त भंगार दिसतं. ट्रक कार्सना चिरडतो. कारचा चक्काचूर होतो.
— traffic-accidents (@DeadlyAsphaIt) February 24, 2022
अपघाताचा हा थरारक असा व्हिडीओ आहे. सुरुवातीला मंद गतीने चालणाऱ्या गाड्या पाहता, इथं असा काही भीषण अपघात होऊ शकतो, याचा विचारही आपण केला नव्हता. हा अपघात कधी, कुठे झाला आहे याची माहिती नाही. अपघातात जीवितहानी झाली आहे की नाही याचीही काही माहिती नाही. पण अपघात इतका भयंकर आहे की कारमधील लोकांचा जीव वाचवला नसावा, असंच दिसतं आहे.
ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. अपघाताचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Road accident, Truck accident, Viral, Viral videos