मुंबई, 19 ऑगस्ट : अपघाताचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. एका भरधाव कारने गाड्यांना उडवलं आहे. दोन कार्सना धडक देत या कारने बाईकस्वाराला चिरडलं आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अवघ्या काही सेकंदात झालेल्या या भयानक अपघाताचा हा व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल. भरधाव कार तिच्यासमोरील सर्व गाड्यांना उडवत गेली. ती इतक्या वेगाने येते की काही कळायच्या आत लागोपाठ तीन गाड्यांना उडवते. यात बाईकचाही समावेश आहे. हा बाईकस्वार या कारखाली चिरडतो. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रस्त्यावर बऱ्याच गाड्या आहेत. सर्वकाही शांत आहे. गाड्या हळूहळू रस्ता काढत पुढे जात आहेत. इतक्यात एक कार वाऱ्याच्या वेगाने येते. विरुद्ध दिशेने म्हणजे समोरून येणाऱ्या कारला ती धडकते. ती कार रस्त्याच्या किनाऱ्यावर जाते. या कारला उडवत ही कार पुढे जाते. तिथं एक बाईकस्वार असतो. या बाईकस्वाराला कार टक्कर देताच बाईकस्वार कारखाली जातो.
कार बाईकस्वाराला चिरडते. त्यानंतर त्या बाईकच्या पुढे एक कार आहे, या कारलाही ही कार धडकते आणि तिथंच पलटी होते. हे वाचा - काळ आला होता पण वेळ नाही! अवघ्या 10 सेकंदावर मृत्यू फक्त 8 पावलांमुळे वाचला जीव; Watch Video या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याचं दिसतं आहे. त्यामुळेच कारचा वेग इतका होता. पण कारने ज्या भयानक पद्धतीने टक्कर मारली आहे, त्यामुळे त्याखाली आलेल्या बाईकस्वाराला गंभीर दुखापत झाली असावी किंवा त्याचा मृत्यू झाल्याचीही शक्यता टाळता येत नाही. पुढे दुसऱ्या कारला धडकल्याने ही कार पलटी होऊन थांबली. नाहीतर कितीतरी गाड्यांना तिने उडवलं असतं.