इस्तंबूल, 22 ऑगस्ट : सोशल मीडियावर आपल्यासमोर नेहमीच असे व्हिडीओ येत असतात, जे आपलं मनोरंजन करतात. येथे सगळ्याच लोकांच्या आवडीचे व्हिडीओ पाहायला मिळतात. यामुळेच तर तुम्ही एकदा का सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आलात की, येथे तुमचा वेळ कसा निघून जातो, हे तुमचं तुम्हालाच कळत नाही. सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुमच्या अंगावरती काटा उभा राहिल. हा व्हिडीओ एका अपघाताचा व्हिडीओ आहे. जो तुर्कस्तानमध्ये असल्याचे समोर आले आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, या रस्त्यावर एका वेळेला दोन भयानक अपघात झाले. खरंतर या रस्त्यावरती आधी एका कारचा अपघात झाला. त्यानंतर तेथे ऍम्ब्युलन्स बोलवण्यात आली आणि त्यानंतर काही जखमींना हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची तयारी सुरू होती, पण त्याचवेळी तेथे एक अनियंत्रित बस आली आणि या बसने अनेक लोकांना चिरडले. तुम्हाला व्हिडीओ पाहून लक्षात आलंचं असेल की हा अपघात किती भयानक होता. ज्यामध्ये सुमारे तीन डझन लोकांनी आपले प्राण गमावले असल्याची माहिती मिळाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण तुर्कीपासून सुमारे 250 किमी अंतरावर झालेल्या या घटनेत किमान 35 लोक ठार झाले आहेत. या भीषण अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला, तर अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत.
Major car accident in Turkey.
— 301 Military (@301military) August 20, 2022
In the province of Mardin, the brakes of a truck broke: the car crashed into a crowd of people, and then into a cafe building.
According to preliminary data, 16 people were killed and 30 injured. pic.twitter.com/VSvPINU4rv
दक्षिण-पूर्व प्रांत गॅझियानटेपचे प्रादेशिक गव्हर्नर दावूत गुल यांनी सांगितले की, अपघातस्थळी ही घटना घडल्यामुळे आपत्कालीन कामगार आणि पत्रकारांसह 16 जणांचा मृत्यू झाला. < पाहा VIDEO : मुलीच्या लाजीरवाण्या कृत्यापुढे मुख्यमंत्री असलेल्या बापाने टेकले गुडघे, मागितली जाहीर माफी त्यात आणखी 20 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अल जझीराच्या वृत्तानुसार, या घटनेत आतापर्यंत 35 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
गझियानटेपच्या पूर्वेकडील रस्त्यावर अपघातस्थळी असलेले राज्यपाल दावूत गुल म्हणाले, “सकाळी 10:45 वाजता येथे प्रवासी बसचा अपघात झाला. अग्निशमन दल, वैद्यकीय पथक आणि इतर मदतनीस अपघातस्थळी मदतीसाठी पोहोचले असताना एका भरधाव वेगाने आलेल्या बसचा ताबा सुटला, ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला.”