Home /News /viral /

खरंच प्रेमात आंधळा झाला! गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्याच्या नादात शेकडो लोकांचा जीव लावला पणाला

खरंच प्रेमात आंधळा झाला! गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्याच्या नादात शेकडो लोकांचा जीव लावला पणाला

प्रेमासाठी काहीही!

प्रेमासाठी काहीही!

छोकरीच्या नादात त्याने नोकरीही गमावली.

    वॉशिंग्टन, 17 ऑगस्ट : प्रेम (Love) आंधळं असतं असं म्हणतात. खरंच प्रेमात कपलला (Couple) एकमेकांशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. याचाच प्रत्यय आला तो अमेरिकेत. एका बॉयफ्रेंडने (Boyfriend) आपल्या गर्लफ्रेंडला (Girlfriend) खूश करण्याच्या नादात शेकडो लोकांचा जीव पणाला लावला. प्रैमात वेडा झालेल्या ट्रेन ड्रायव्हरने (Train driver girlfriend operate train) असा कारनामा केला आहे, ज्यामुळे प्रत्येकाला धक्का बसला आहे. अंडरग्राऊंड ट्रेन (Underground Train) ड्राइव्हरने आपल्या गर्लफ्रेंडला ट्रेनमध्येच डेटवर बोलवलं आणि गिफ्ट तिच्या हातात शेकडो लोकांचा जीवच दिला. न्यूयॉर्क सबवेतील (New York Subway) ही धक्कादायक घटना आहे. 32 वर्षांचा टेरेल हॅरिसने (Terrell Harris) आपली 28 वर्षांची गर्लफ्रेंड डॉमिनिक बेलग्रेव्हला डेटवर आपल्या ट्रेनच्या कंट्रोल रूममध्ये बोलवलं. इथं त्याने काही वेळासाठी आपल्या गर्लफ्रेंडच्या हाती ट्रेनचा कंट्रोल दिला. त्यावेळी शेकडो प्रवासी या ट्रेनमध्ये होते. हे वाचा - ऑफिसमध्ये बायकोची आठवण आल्यास सुट्टी; रोमान्ससाठी खास Fertility paid leave बेलग्रेव्हने हा व्हिडीओ बनवला आणि आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. व्हिडीओत ती ट्रेनचं स्विच आणि लिव्हरवर हात ठेवलेली दिसली. सोबतच तिने हा, मी यावेळी ट्रेन चालवते आहे, असं कॅप्शनही या व्हिडीओला दिलं आहे. या कपलने आपला सेल्फी घेऊनही सोशल मीडियावर शेअर केला. हॅरिस गेल्या दहा वर्षांपासून ड्रायव्हरची नोकरी करतो आहे. त्याला चांगला पगारही होता. पण त्याने प्रेमात हा जो मूर्खपणा केला आहे, त्यामुळे त्याने आपली नोकरीही गमावली आहे. त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. त्याला आता कधीच ट्रेनच्या कंट्रोल रूममध्ये येण्याची परवानगी दिली जाणार नाही. हे वाचा - स्वत:च्याच प्रेमात पडण्यात असते वेगळी मजा; कधी केलेत का हे उद्योग? शिवाय या कपलला शेकडो लोकांचा जीव धोक्यात घालण्याच्या आरोपात तुरुंगवासही होऊ शकतो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: America, Couple, Viral, Viral news

    पुढील बातम्या