स्वत:च्याच प्रेमात पडण्यात असते वेगळी मजा; कधी केलेत का हे उद्योग?
इतरांना सुखी ठेवण्यात किती आयुष्य (Life) घालवायचं. थोडा स्वार्थी विचार करून स्वत:लाही महत्व (Self-Importance) द्यायला हवं.
|
1/ 14
आपल्याला वाटतं की इतरांनीही आपल्यावर प्रेम करावं. पण, जोपर्यंत आपण स्वत:वर प्रेम करत नाहीत, तोपर्यंत इतर लोकही आपल्यावर प्रेम करत नाहीत. असे बरेच लोक आहेत ज्यांना स्वत: वर प्रेम करण्यापेक्षा इतरांवर प्रेम करणं सोपं वाटतं.
2/ 14
कधी आईवडिलांची इच्छा,कधी मित्रमैत्रिणी,ऑफिसं,मुलं,कुटूंब यांच्या व्यापात, जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली मागे वळून पाहतांना वाटतं कि जगायचं राहिलं. म्हणूनचं या गोष्टीचा आधीच विचार करा.
3/ 14
इतरांच्या नजरेत चांगलं होण्याच्या प्रयत्नात, आपण एकाच वेळी बरेच कॅरेक्टर जगायला लागतो. त्यामुळे आपल्याच मनात निगेटीव्ह आणि कडवट भावना निर्माण होते. आपल्या स्वतःच्या उणीवा पाहून आपण आपल्या नजरेत पडू लागतो.
4/ 14
हेच आपल्या दुख:चं कारण बनतं. त्यामुळे स्वतःवर प्रेम करण्यासाठी आयुष्यात कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत म्हणजे नेहमीच आपण आतून आनंदी आणि सकारात्मक राहू शकू याचा विचार करा.
5/ 14
स्वतःच्या आवडी निवडी काय आहेत? आपल्याला आयुष्य कसं जगायचे आहे? आपली मुल्य काय आहेत? हे ओळखा त्यांना महत्व द्या.
6/ 14
गरज असेल तिथे नकार द्यायला शिका. बर्याच वेळा आपण कोणालाही वाईट वाटू नये, मन दुखावू नये यातच प्रत्येक गोष्टीला होकार द्यायला लागतो. पण, आवश्यक असेल त्यावेळी नकार द्यायला हवा.
7/ 14
स्वतःची तुलना कोणाबरोबरही करू नका. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं आणि त्यांची मूल्यं वेगळी असतात. त्यामुळे त्यात तुलना करणं चुकीचं आहे.
8/ 14
आपल्याबद्दल कोणी वाईट बोलं तर, लगेच ते मनाला लावून घेऊ नका. स्वतःच्या चांगल्या गोष्टी विसरून जाऊ नका. आपली ताकद, जमेची बाजू यांच्यावर विश्वस ठेवा.
9/ 14
काही चांगलं काम केलं, काही अचिव्हमेन्ट केली असं वाटतं असेल तर, स्वत:ला ट्रिट द्यायला विसरू नका. असं केल्याने मनाला आनंद मिळेल. छोट्यातल्या छोट्या गोष्टीत स्वत:लाचं शाब्बासकी द्या.
10/ 14
कधीकाळी काही चुक झाली असेल तर,आयुष्यभर त्याचा पश्चात्ताप करू नका,स्वत:ला माफ करा आणि पुढे जा.
11/ 14
आपण प्रत्येकाला आनंदी ठेवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. सर्वांना आनंदी ठेवावं असं वाटत तर, ते अशक्य आहे. सर्वांना आनंदी करण्याच्या नादात आपण, स्वतःला आंनंदी ठेवणं विसरून जातो.
12/ 14
आपल्या आयुष्यात करियर किंवा पगाराबरोबरच कामातून मिळणारा आनंदही महत्वाचा आहे. आपल्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढा.
13/ 14
आजपर्यंत आपण जे काही साध्य केले ते एखाद्या ठिकाणी लिहून ठेवा किंवा त्या आठवणींचे फोट एखाद्या फ्रेममध्ये सजवा. ती फ्रेम रोज पहा. यामुळे आत्मविश्वास वाढेल.
14/ 14
आपलं शरीर आणि आपलं मन आपले खरे जोडीदार आहेत त्यांची काळजी घ्या. मन आणि शरीर स्वस्थ असेल तरच उत्साह वाढतो.