Home /News /lifestyle /

ऑफिसमध्ये बायकोची आठवण आल्यास मिळणार सुट्टी; रोमान्ससाठी खास Fertility paid leave

ऑफिसमध्ये बायकोची आठवण आल्यास मिळणार सुट्टी; रोमान्ससाठी खास Fertility paid leave

कपलसाठी खास सुट्टी

कपलसाठी खास सुट्टी

10 दिवसांची सुट्टी घेऊन आता कर्मचाऱ्यांना आपल्या जोडीदारासोबत रोमान्स करता येणार आहे.

    टोकियो, 17 ऑगस्ट : सण, आजारपण आणि प्रेग्नन्सीच्या कालावधीत खास सुट्ट्या असतात हे आपणा सर्वांना माहितीच आहे. पण रोमान्ससाठी सुट्टी (Fertility leave) कधी ऐकली आहे का? पण जपान सरकारने चक्क रोमान्ससाठी सुट्टी (Fertility leave in Japan) जाहीर केली आहे. 10 दिवसांची सुट्टी घेऊन आता कर्मचाऱ्यांना आपल्या जोडीदारासोबत रोमान्स करता येणार आहे. जपान (Japan) सरकारने तरुण जोडप्यांसाठी एक विशेष योजना लागू केली आहे. ज्यामध्ये फक्त रोमान्स करण्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे. तब्बल 10 दिवसांची ही फर्टिलिटी लिव्ह (10 days fertility leave) असेल. विशेष म्हणजे या सुट्टीचा पगार कापला जाणार नाही. म्हणजे ही पेड लिव्ह असणार आहे. हे वाचा - कंडोमची गरजच पडणार नाही; तुमच्या शरीरातील अँटिबॉडीज रोखणार प्रेग्नन्सी या सुट्टीचं उद्दिष्ट म्हणजे जपानची लोकसंख्या (Population of Japan) वाढवणं. जपानची लोकसंख्या घटली आहे. 1950-1971 सालापर्यंत जपान जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या 10 देशांमध्ये होता. आता इथं जन्मदर खूप घटला आहे.  126 दशलक्षपेक्षाही कमी झाली आहे. त्यामुळेच सरकारला असं पाऊल उचवावं लागलं. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना आपल्याला असलेल्या सुट्ट्यांमधूनच फर्टिलिटी लिव्ह घ्यावी लागत होती. पण आता विशेष फर्टिलिटी लिव्हची सुविधा देण्यात आली आहे. लोक सुट्टी घेऊन घरी राहून रोमान्स करतील आणि जास्तीत जास्त मुलं जन्माला घालतील. देशाच्या लोकसंख्या वाढीत त्यांचं योगदान असणार आहे, म्हणून त्यांच्या या सुट्ट्यांचा पगार कापला जाणार नाही. हे वाचा - ऑफिसमध्ये 'या' गोष्टी चुकूनही बोलू नका; अन्यथा धोक्यात येऊ शकतं तुमचं करिअर जपानच्या नॅशनल पर्सोनल अथॉरिटीचे अध्यक्ष युको कावामोटो  (Yuko Kawamoto) यांनी सांगितलं, काम आणि मुलं जन्माला घालणं दोन्ही एकत्र नाही करू शकतं, असं सरकारी कर्मचाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे सरकारने त्यांनी सूट दिली आहे. आता वर्षभऱात 10 दिवसांची पेड लिव्ह फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी दिली जाईल.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Employment, Japan, Lifestyle

    पुढील बातम्या