मुंबई 11 सप्टेंबर : सोशल मीडियावर नेहमीच आपल्यासमोर वेगवेगळे व्हिडीओ येत असतात, हे व्हिडीओ कधी मनोरंजक तर कधी धक्कादायक असतात. सध्या असाच एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. जो व्हिडीओ पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल. हा व्हिडीओ रेल्वे अपघाताचा आहे. ज्यामध्ये एका रिक्षा चालक थोडक्यात बचावला आहे. हा व्हिडीओ अलिगढमधील रेल्वे ट्रॅकवरील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रेन येत असल्यामुळे इतरांसाठी रेल्वे क्रॉसिंग बंद करण्यात आलं आहे. परंतू तरी देखील एक रिक्षा चालक आपल्या जीवाची पर्वा न करता आपली रिक्षा घेऊन हळूहळू रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्याचा प्रयत्न करतो. असं करत असताना तो आपल्या आजूबाजूला पाहाण्याचं देखील कष्ट घेत नाही. ज्यामुळे ट्रेन त्याच्या जवळ येत असल्याचं त्याला दिसलं नाही, ज्यामुळे मोठा अपघात घडला. हा रिक्षा चालक आपली रिक्षा घेऊन रेल्वे ट्रॅकवर पोहोचला, तेवढ्यात त्याच्या उजव्या बाजूने भरधाव वेगाने ट्रेन आली, या ट्रेनमुळे या रिक्षा चालकाची रिक्षा चिरडली गेली, परंतू नशीबाने या चालकाचा जीव बचावला आहे. हे वाचा : National Highway वर बाईक स्वाराकडून खतरनाक स्टंट, Video व्हायरल खरंतर ट्रेन ज्या वेगाने आली, त्या वेगामुळे ट्रेनने या रिक्षा चालकाला लांब फेकले. त्यामुळे त्याला दुखापत झाली, परंतू त्याचे प्राण वाचले आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. अलीगढमधील सीमा चौकात शुक्रवारी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. येथे शुक्रवारी सकाळी रिक्षाचालक बंद रेल्वे फाटक बायपास करून ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आला आहे. तेव्हापासून ते व्हायरल होत आहे.
#WATCH उत्तर प्रदेश: अलीगढ़ में रेलवे ट्रैक पार करते समय एक रिक्शा चालक ट्रेन की चपेट में आने से बचा। (09.09) pic.twitter.com/kY76sdzVK6
— ANI_HindiNews (@AHindinews) September 10, 2022
त्याचवेळी व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी या रिक्षा चालकाला अटक केले आहे. हे वाचा : Video : त्याला केस कापण्यासाठी 47 सेकंद पुरेस…. तरुणाच्या नावे आगळा-वेगळा रिकॉर्ड, ज्याला कोणीही तोडू शकलं नाही अलीगढचे आरपीएफ इन्स्पेक्टर राजीव वर्मा या घटनेबाबत म्हणाले, “आम्हाला याबाबत माहिती मिळाली आणि रिक्षाचालक तेथून पळून गेला. आम्हाला माहिती मिळताच आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यावरून आम्हाला रिक्षाचालकाची माहिती मिळाली. रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे आणि तुरुंगात पाठवले गेले आहे.”