दौसा 7 सप्टेंबर : रस्त्यावर होणाऱ्या अपघातांना रोखण्यासाठी सरकार वेगवेगळे मार्ग काढत आहेत. त्यात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे रस्त्यासंबंधीत विविध नियम बनवत आहेत. बिझनेसमॅन साइरस मिस्त्री आणि नेते विनायक मेटे यांच्या सोबत घडलेल्या आणि इतर अपघातांना लक्षात घेऊन सरकार कार सेफ्टी संदर्भात काही नवीन आणत आहेत. ज्यामध्ये गाडीतील सर्वच लोकांसाठी सिटबेल्ट सक्तीचं करण्याचा विचार केला जात आहेत. यादरम्यान एक व्हिडीओ समोर आला आहे.
एकीकडे सरकार लोकांच्या सेफ्टीसाठी वेगवेगळ्या योजना आखत आहे, पण दुसरीकडे लोक अशा थरारक स्टंट करुन स्वत:चं आणि दुसऱ्याचं आयुष्य देखील धोक्यात टाकत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ राजस्थातमधील दौसा येथील राष्ट्रीय महामार्गावरील आहे. जो खूपच धोकादायक आहे. या राष्ट्रीय महामार्गावर एक तरुण बाईकवर स्टंटबाजी करताना दिसला.
हा तरुण कधी एका बाजूला दोन्ही पाय ठेवून बसलेला दिसला, तर कधी हात सोडून बाईक चालवताना दिसला. दुचाकीस्वाराला समोरून दोन ट्रक दिसताच तो बाईकवर पाय व्यवस्थित ठेवतो पण दोन ट्रकच्या मधोमध जाताच आपले हात सोडून दुचाकी बाहेर काढतो. यानंतर दुचाकीस्वाराला समोरून ट्रक दिसताच त्याने आपली गाडी सर्व्हिस रोडवर घेतली.
हे वाचा : चौकात घडला दुचाकीचा अपघात, दोन बाईक एकमेकांना अशाकाही धडकल्या की... पाहा VIDEO
ही सगळी घटना मागून येणाऱ्या एका कारमधील प्रवाशानं कैद केली आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला. या तरुणाचा व्हिडीओ बनवला जात असल्याचे समजताच तो रस्त्यावरून निघून गेला.
#राजस्थान के दौसा में सड़क पर जानलेवा स्टंट!सड़को पर हो रहे हादसे को लेकर @nitin_gadkari चिंतित है,और कारों में सुरक्षा के लिहाज से पीछे बैठने वाले को भी सीटबेल्ट आवश्यक मान रहे है,वही कुछ लोग हादसों को आमंत्रण दे रहे है,यह शख्स कभी हाथ छोड़ता है,तो कभी दोनो पैर एक तरफ करता है, pic.twitter.com/FY7JUhSkKk
— Vikas Singh Chauhan (@vikassingh218) September 7, 2022
नशीबानं या व्यक्तीला काहीही झालं नाही, परंतू त्याचा हा स्टंट त्याच्या जीवावर देखील बेतू शकला असता. इतकचं नाही, तर त्याच्या या हल्गर्जीपणामुळे इतर कोणत्याही व्यक्तीला दुखापत होऊ शकते. त्यामुळे त्यानं हे करणं फारच चूकीचं आहे.
जोपर्यंत लोक असं वागत राहाणार तो पर्यंत इतरांच्या रोड सेफ्टीचा प्रश्न ऐरणीवर टांगलेला राहाणार.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Stunt video, Top trending, Viral news