मुंबई 11 सप्टेंबर : केस कापण्यासाठी किंवा दाढी करण्यासाठी लोक सलूनच्या बाहेर तासनतास थांबतात. त्यात काही मोठ्या शहरात प्रोफेश्नल्सकडून केस कापण्यासाठी लोक आधी अपाँटमेट घेतात. एवढंच काय तर अमेरिका आणि युरोपमध्ये लोकांना केस कापण्यासाठी आधीच अपॉइंटमेंट घ्यावी लागते. कारण स्टाईशला एका व्यक्तीचे केस कापण्यासाठी साधाराण 15 ते 30 मिनिट किंवा त्याहून जास्त काळ जातो. परंतू जर आम्ही असं सांगितलं की आता 1 मिनिटापेक्षा कमी वेळात तुमचे केस कापले जाणार तर? तुम्ही मनात विचार करत असाल की, आता हे कसं शक्य आहे? 1 मिनिटापेक्षा कमी वेळात केस कापणे हे जवळ-जवळ अशक्य आहे आणि समजा कापले गेले, तरी ते बरोबर कापले जाणार नाही, म्हणजेच कोणत्याही आकारात वाकडे-तिकडे कापले जातील. पण असं नाही, यासाठी तुम्ही व्हिडीओ पाहा तुमच्या सगळं लक्षात येईल. वास्तविक गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाच वर्षे जुना म्हणजेच 2017 चा आहे. परंतू हा व्हिडीओ आता पुन्हा ट्रेंड होऊ लागला आहे. हे वाचा : राष्ट्रगीतामध्ये लपलाय भारताचा पूर्ण नकाशा, या ओळीबद्दल असा विचार तुम्ही कधीच केला नसावा; पाहा व्हिडीओ या व्हिडीओमधील या केस कापणाऱ्या व्यक्तीने अवघ्या 47.17 सेकंदात समोर बसलेल्या व्यक्तीचे केस कापले. जे पाहून सर्वच लोक हैराण झाले, एवढंच नाही तर तुम्ही व्हिडीओमध्ये पुढे पाहू शकता की काही व्यक्ती येतात आणि पट्टीच्या सह्याने डोकाच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून त्या व्यक्तीच्य केसांना मोजतात. ज्यामध्ये त्यांना देखील हे स्पष्ट होतं की, या केस कापणाऱ्या व्यक्तीने कमी वेळात खूप चांगले आणि स्टाईलमध्ये केस कापले आहेत. सर्वात जलद केस कापण्याचा हा विक्रम 19 फेब्रुवारी 2017 रोजी अथेन्स, ग्रीस येथे कॉन्स्टँटिनोस कौटुपिस नावाच्या व्यक्तीने केला. ट्विटरवर हा व्हिडीओ पाहून अनेक लोक कमेंट करत आहेत. काही लोक म्हणत आहेत की,’ हे कसं शक्य आहे?’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘ज्या व्यक्तीचे केस कापले गेले आहेत तो स्वत: खुश नाही.’
Need a quick trim? How about a 45 second trim? 💇♂️ pic.twitter.com/DqeokLazg2
— Guinness World Records (@GWR) September 4, 2022
हे वाचा : सुंदर महिलेला पाहून आजोबांना पडला आपल्या वयाचा विसर; करु लागले असा डान्स, आता Video घालतोय धुमाकूळ लोक कमेंटमध्ये काहीही बोलत असले तरी, अनेकांना हा व्हिडीओ फारच आवडला आहे. हा रेकॉर्ड करुन आता 5 वर्षे झाली असली तरी, हा विक्रम गेल्या पाच वर्षात इतर कोणीही मोडला नाही. आता हा विक्रम कोण मोडणार आणि यापेक्षा किती कमी वेळात केस कापता येऊ शकतात? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.