Home /News /viral /

वडिलांचा फोन पाहताच मुलानं पोलिसांना कॉल करून घरी बोलावलं; कारण वाचून व्हाल थक्क

वडिलांचा फोन पाहताच मुलानं पोलिसांना कॉल करून घरी बोलावलं; कारण वाचून व्हाल थक्क

ज्या मुलानं पोलिसांना कॉल केला होता, त्याच्या आईची तब्येत ठीक नव्हती. अशात वडील आपल्या छोट्या बाळासोबत व्यस्त होते. यानंतर मुलानं लपून पोलिसांना फोन केला

    नवी दिल्ली 21 ऑक्टोबर : लहान मुलांची मस्ती (Naughty children) नेहमीच सुरू असते. कधीकधी ही मस्ती अतिशय प्रेमळ वाटते तर कधीकधी ही मस्तीच पालकांसाठी अडचणीची ठरते. न्यूझीलंडमधील एका लहान मुलानंही अशीच मस्ती केली. वडील दुसऱ्या काहीतरी कामात व्यग्र असतानाच या मुलानं त्यांचा फोन घेतला आणि थेट पोलिसांनाच घरी बोलावलं (Toddler Calls Police) . मात्र, पोलिसांना घरी बोलवण्याचं कारण अतिशय वेगळं होतं. अरे बापरे! झोका देता देता स्वतःही हवेत उडाला तरुण; पाहा VIDEO न्यूझीलंडच्या (New Zealand) साउथ आयलँड पोलिसांनी स्वतःच ही घटना सांगितली. मुलाचा कॉल रिलीज करत पोलिसांनी सोशल मीडियावर लिहिलं, की हा इतका क्यूट कॉल होता, की शेअर केल्याशिवाय राहावलं नाही. ४ वर्षाच्या मुलानं आपल्या वडिलांच्या मोबाईलवरुन 111 नंबर डाईल केला आणि लपून पोलिसांसोबत बोलू लागला. मुलानं पोलिसांना आपल्या घरी बोलावलं (4 year old boy calls police), जेणेकरून तो त्यांना आपली खेळणी दाखवू शकेल आणि त्यांच्यासोबत खेळू शकेल. ज्या मुलानं पोलिसांना कॉल केला होता, त्याच्या आईची तब्येत ठीक नव्हती. अशात वडील आपल्या छोट्या बाळासोबत व्यस्त होते. यानंतर मुलानं लपून पोलिसांना फोन केला आणि विचारलं की हा पोलीस लेडीचा नंबर आहे का?ऑपरेटरनं या मुलाला विचारलं की त्याला काय मदत हवी आहे. यानंतर मुलानं पोलिसांनी खेळणी दाखवण्यासाठी आपल्या घरी बोलावलं आणि पोलिसांना या कॉलबद्दल सांगितलं. ती बातम्या देत होती आणि मागे सुरू होतं अश्लील दृश्य; तो VIDEO पाहून प्रेक्षक शॉक कॉलवर बोलल्यानंतर पोलिसांनी ठरवलं की ते या मुलाची खेळणी पाहण्यासाठी जाणार. कर्ट नावाचे पोलीस अधिकारी मुलाच्या घरी पोहोचले आणि त्याचं टॉईज कलेक्शन पाहिलं. इतकंच नाही तर पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये हेदेखील सांगितलं की या मुलाकडे भरपूर खेळणी होती. पोलिसांनी केलेल्या या कामाचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Police, Viral news

    पुढील बातम्या