• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • अरे हे काय? ती बातम्या देत होती आणि मागे सुरू होतं Porn; न्यूज चॅनेलवरील तो VIDEO पाहून प्रेक्षकही Shocked

अरे हे काय? ती बातम्या देत होती आणि मागे सुरू होतं Porn; न्यूज चॅनेलवरील तो VIDEO पाहून प्रेक्षकही Shocked

हवामानाचं वृत्त देता देता अचानक सुरू झाला पॉर्न व्हिडीओ.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 20 ऑक्टोबर : टीव्हीवर (Tv) बातम्या पाहत असताना न्यूज अँकरच्या मागे एक विशिष्ट अशी स्क्रीन दाखवली जाते. या स्क्रीनवर फोटो किंवा काही व्हिडीओही दिसत असतात. हे फोटो, व्हिडीओ बातम्यांशी संबंधित असतात. पण सध्या सोशल मीडियावर अशा एका बातमीपत्राची चर्चा सुरू आहे, ज्याने खळबळ उडाली आहे. या न्यूज बुलेटिनमध्ये न्यूज अँकरच्या (News anchor) मागे असा व्हिडीओ दिसला जो पाहून प्रेक्षक शॉक झाले (Porn video on news channel). एक महिला अँकर टीव्हीवर (Female US News Anchor) हवामानाची बातमी (Weather Report) देत होती. तेव्हा अचानक तिच्या मागे असलेल्या स्क्रीनवर एक व्हिडीओ सुरू झाला.  हा व्हिडीओ म्हणजे चक्क पॉर्न व्हिडीओ होता. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार KREM न्यूजची अँकर कोडी प्रॉक्टर हवामानाचं वृत्त देत होती. तापमानाचा उल्लेख करत असं कधीपर्यंत चालंल असं ती म्हणते, तितक्यात मागे स्क्रीनवर पॉर्न व्हिडीओ सुरू झाला. कोडीलासुद्धा मागे काय सुरू आहे हे माहिती नव्हतं. त्यामुळे ती आपली बोलत राहिली. हे वाचा - गर्भधारणेसाठी पुरुषांच्या वीर्यात शुक्राणूंची संख्या किती असावी? वाचा सविस्तर न्यूज चॅनेलवर तो व्हिडीओ पाहताच चॅनेलकडे तक्रारीचे फोन आले आणि चूक लक्षात येताच तो व्हिडीओ तात्काळ बंद करण्यात आला. चॅनेलने आपल्या प्रेक्षकांची माफीही मागितली. KREM ने माफी मागताना सांगितलं. रात्री 11 च्या शोमध्ये जे काही झालं, त्यासाठी आम्ही प्रेक्षकांची माफी मागतो. शोच्या पहिल्या भागात एक आपत्तीजनक व्हिडीओ सुरू झाला होता. यापुढे भविष्यात असं पुन्हा होणार नाही, याची आम्ही खबरदारी घेऊ. तसंच इतकी मोठी चूक नेमकी कशी झाली, याचा तपास आम्ही करत आहोत. हे वाचा - ऑर्डर केले सॉक्स Myntra ने पाठवली Bra; संतप्त तरुणाने घेतला धक्कादायक निर्णय याआधी बीबीसी न्यूजच्या (BBC News) एका शोचा फोटो व्हायरल झाला होता. बीबीसी वेल्स टुडेवर (BBC Wales Today) कोरोना महासाथीच्या (Covid 19) काळातील अनुभव यावर एक शो घेण्यात आला होता. या शोमध्ये सहभागी झालेल्या महिलेच्या मागे जे काही दिसलं त्यामुळे सर्वांना धक्का बसला होता. महिला गेस्टच्या मागे पुस्तक आणि फाईल्सने भरलेल्या शेल्फवर सेक्स टॉयसारखं काहीतरी दिसत होतं.  पण हे सेक्स टॉय आहे की आर्ट पीस आहे यावरूनही चर्चा रंगली होती.
  Published by:Priya Lad
  First published: