लंडन, 21 ऑक्टोबर : झोक्यावर (Swing) बसायला कुणाला आवडत नाही. पण झोक्यावर बसण्याच्या (Swing video) इतका आनंद असतो तितकाच आनंद झोका देण्यातही असतो. असाच झोका देता देता एक तरुण चक्क स्वतःच हवेत उडाला आहे (Shocking swing video). हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. व्हिडीओ पाहताच धडकी भरेल. तरुण इतका जोशात झोका देत होता की झोका त्यालाही घेऊन उडाला. झोक्यासह तरुण हवेत उंच भिरकावला गेला. एक-दोन नव्हे तर तीन-तीन जणांना हा तरुण एकटा झोका देत होता. इतरांना झोक्यावर बसवून उंच झुलवताना तरुण मध्येच स्वतः झोक्याकडे पाठ करून उभा राहतो आणि झोक्याची धडक त्याला बसते आणि तो हवेत उडून पलीकडे जातो आणि धाडकन जमिनीवर आपटतो.
होल्ड माय बिअर ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. लाँच असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हा तरुण खरंतर स्टंट करण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला हा प्रयत्न भारी पडला आहे. हा मजेशीर व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हे वाचा - OMG! चिमुरड्यांच्या झोपाळ्यावर झुलता झुलता हवेत उंच गेले आजोबा आणि…; VIDEO VIRAL याआधी झोक्यावर स्टंट करताना असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एक तरुण झोका घेत घेत उडी घेऊन पायजमा घालताना दिसतो. हा व्हिडिओ तारना हुसैननं ट्विटरवर शेअर केला.
The first jump is brilliant.... incredible... unbelievable 👌👌. #action #stunt #adventure @hvgoenka pic.twitter.com/QmUyH7Cg2z
— Tarana Hussain (@hussain_tarana) September 28, 2021
व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती झाडावर बांधण्यात आलेल्या झोक्यावर खेळत आहे. इतक्यात अचानक तो खाली उडी घेतो. त्याच्या समोर दोनजण हातात पायजमा घेऊन उभा असतात. झोका खेळणाऱ्या व्यक्तीचा अंदाज इतका परफेक्ट असतो की उडी घेताच ती व्यक्ती आपले दोन्ही पाय या पायजमामध्ये ठेवते आणि अगदी आरामात पायजमा घालते. हे वाचा - झुलता झुलता एकावर एक बसत गेले आणि तुटला झोपाळा; पुढे काय घडलं पाहा VIDEO हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरनं लिहिलं, की या म्हणतात टायमिंगचा खेळ. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की हा व्हिडिओ खरंच अजब आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ चांगलाच लोकप्रिय झाला.