नवी दिल्ली 01 जुलै: महिला आयएएस अधिकारी चांदनी (IAS Chandni Chandran) यांनी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करतानाच्या दिवसातले काही फोटो आपल्या ट्विटरवर (Twitter) शेअर केले आहेत. यात त्या आपल्या बॉयफ्रेंडसोबत (Boyfriend) दिसत आहेत. फोटो शेअर करत त्यांनी आपल्या आयएएस बनण्याच्या प्रवासाचा किस्सादेखील शेअर केला आहे आणि सांगितलं आहे की कशाप्रकारे या एका फोटोनं त्यांचं आयुष्य (Turning Point) बदललं.
चांदनी चंद्रन 2017 बॅचच्या आयएएस ऑफिसर आहेत आणि सध्या त्रिपुराच्या कंचनपुर इथे एसडीएम पदावर तैनात आहेत. चांदन चंद्रन यांनी आपल्या ट्विटवर साल 2016 चा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आला होता. या फोटोमध्ये चांदनी आपला बॉयफ्रेंड (सध्याचा पती) अरुण सुदर्शन यांच्यासोबत दिसत आहे.
या 'पवित्र' जंगलात कपडे न घालताच वावरतात स्त्रिया; पुरुषांना आहे सक्त प्रवेशबंदी
चांदनीनं आपल्या ट्विटरवर लिहिलं, की 10 मे 2016. सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2015 चा अंतिम निकाल हाती येणार होता. मी अरुण सुदर्शनसोबत तणाव दूर करण्याच्या उद्देशानं बाहेर गेले होते. माझं सिलेक्शन झालं नाही. दुसऱ्या दिवशी सगळ्या वृत्तपत्रांमध्ये टॉपर्सचे फोटो छापून आले होते आणि टाइम्स ऑफ इंडियानं आमचा हा फोटो छापला होता. अरुणनं टाइम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसमध्ये फोन करुन हा फोटो छापल्याबद्दल आक्षेप घेतला.
May 10, 2016.Results of Civil Service Exam 2015 was expected to be out & I was roaming with @mrarunsudarsan to not stress over it. I didn't make it. Next day newspapers were filled with pics of toppers & @timesofindia published this pic of us! Arun called ToI & complained (1/3) pic.twitter.com/mYaemtmm5t
— Chandni Chandran (@chandni_ias) June 29, 2021
चांदनी यांनी पुढे सांगितलं, की त्यावेळा आमचं लग्न झालेलं नव्हतं. यूपीएससी टॉपर्सच्या फोटोंनी भरलेल्या वृत्तपत्रात माझा हा असा फोटो छापून येणं मी एका संकेताच्या रुपात घेतलं. त्यांनी सांगितलं, की असा फोटो छापणं त्यांनी एका चॅलेंजच्या रुपात घेतलं आणि पुढच्याच वर्षी 2017 मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं.
‘16 कोटी जमा करायला मदत करा’; रिया चक्रवर्तीची वाढदिवशी चाहत्यांना खास विनंती
चांदनी यांनी सांगितलं, कि यूपीएससीमध्ये झालेल्या या सिलेक्शनंतर मी आणि अरुणनं लग्न केलं. नुकतंच अरुणनं ट्विटरवर सांगितलं होतं, की लॉकडाऊनमुळे मागील दोन वर्षांपासून ते आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करू शकले नाहीत. कारण चांदनी त्रिपुरामध्ये आहेत आणि अरुण केरळमध्ये. चांदनी चंद्रन यांनी आपल्या पुढच्याच ट्विटमध्ये म्हटलं, की काही दिवसांपूर्वीच मी या फोटोबद्दल विचार करत होते आणि अरुणनं फोटोग्राफर राकेश नायर याच्याशी संपर्क साधला. तक्रारीमुळे त्यांना हा फोटो लक्षात होता आणि त्यांनी लगेचच आम्हाला हा फोटो पाठवला. त्यांचे खूप खूप आभार.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Ias officer, Inspiration, Success story, Twitter