मुंबई 1 जुलै: सुशांत मृत्यू प्रकरणामुळं रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) सध्या प्रचंड चर्चेत आहे. या प्रकरणी तिला अटकही करण्यात आली होती. शिवाय बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणातही तिचं नाव पुढे आलं होतं. रियानं आपल्या करिअरमध्ये अद्याप एकही हिट चित्रपट दिलेला नाही. परंतु गेल्या काही काळात इतर दुसऱ्या कुठल्याही अभिनेत्रींच्या तुलनेत रियाचीच चर्चा अधिक पाहायला मिळाली. आज तिचा वाढदिवस आहे. 29 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिनं आपल्या चाहत्यांना एक खास विनंती केली आहे. एका लहान मुलीचे प्राण वाचवण्यासाठी तिनं मदत मागितली आहे.
रिया चक्रवर्तीनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे तिनं एका चिमुरडीला मदत करण्याचं आवाहन केलं आहे. आठ महिन्यांच्या या चिमुरडीला जन्मापासूनच मानेची व शरीराची हालचाल करता येत नाही. तिला ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाइप’ या दुर्मिळ आजाराने ग्रासलं आहे. उपचारासाठी 16 कोटींचे इंजेक्शन अमेरिकेतून आणण्यासाठी खर्च येणार आहे, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. अन् हे 16 कोटी रुपये जमा करण्यासाठी रियानं चाहत्यांकडे मदतीचं आवाहन केलं आहे. यापूर्वी देखील अनेक सेलिब्रिटींनी या मुलीला मदत करण्याचं आवाहन देशवासीयांना केलं आहे.
8 वर्षांपूर्वी सुशांतला पहिल्यांदा भेटली होती रिया; वाचा त्या भेटीबद्दल
Family Man: वेब सीरिजमधल्या या कलाकाराला आर्थिक अडचणींमुळे सोडावा लागला मुंबईतला फ्लॅटअसा होता रिया चक्रवर्तीचा अभिनय प्रवास
रियाचा जन्म 1992 साली बंगळुरूमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. रियाचे वडिल हे आर्मी ऑफिसर होते. त्यामुळे तिचं शालेय शिक्षण देखील आर्मी स्कूलमधूनच झालं होतं. 2009 साली रियाने सिनेसृष्टीत येण्याचा निर्णय घेतला. तिने MTV वरील एका शो मध्ये भाग घेतला होता. ज्यात ती पहिली रनरअप बनली होती. त्यानंतर रियाने टीव्हीच्या काही शोचं होस्टींग केलं. त्यातून तिला लोकप्रियता मिळाली होती. 2013 साली तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
Published by:Mandar Gurav
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.