• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • या 'पवित्र' जंगलात कपडे न घालताच वावरतात स्त्रिया; पुरुषांना आहे सक्त प्रवेशबंदी

या 'पवित्र' जंगलात कपडे न घालताच वावरतात स्त्रिया; पुरुषांना आहे सक्त प्रवेशबंदी

या जंगलात संपूर्ण महिलाराज आहे. कुणी पुरुष चुकून जरी या जंगलात शिरला, तर जबर शिक्षा होते.

  • Share this:
जकार्ता (इंडोनेशिया), 1 जुलै: जगभरात महिला सक्षमीकरणाची (Woman Empowerment) चर्चा होत असते. पुरुषांच्या समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातही आता महिलांनी आपलं कर्तृत्त्व सिद्ध केलं आहे. तरीही स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य आहे असं म्हणता येणार नाही. आजही महिलांना पुरुषप्रधान संस्कृतीत भय असतंच. स्त्रियांना निर्भयपणे फिरण्याचं स्वातंत्र्य कुठंही नाही. इंडोनेशियात (Indonesia sacred forest) मात्र स्त्रियांसाठी एक खास जंगल असून इथं फक्त महिलाच राहतात. या जंगलात महिलांशिवाय कोणीही जाऊ शकत नाही. पुरुषांना इथं येण्यास सक्त मनाई आहे. चुकून कोणी गेलंच तर त्याला जबर शिक्षा होते. इथे वावरताना स्त्रिया कपडे घालत नाहीत (Naked women in jungle) इंडोनेशियातील पापुआ (Papua) इथं असणारं हे जंगल अतिशय पवित्र मानलं जातं. हे खारफुटीचं जंगल (Mangroove Forest) आहे. इथं महिलांना कपडे घालण्यासही मनाई आहे. इथं ज्या स्त्रिया जातात त्यांना कपडे घालता येत नाहीत. इथं ही परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे. स्त्रिया नैसर्गिक अवस्थेत फिरतात. महिलांच्या सुरक्षेसाठी पुरुषांना इथं येण्याची परवानगी नाही. बीबीसी इंडोनेशियाच्या वृत्तानुसार, चुकून एखादा पुरुष इथं डोकावताना आढळला तर त्याला मोठी नुकसान भरपाई द्यावी लागते. कोणी प्रयत्न केल्यास त्यांना इथल्या आदिवासी जमातीच्या न्यायालयात (Tribe Court) नेलं जातं. नियमांनुसार त्याला 5 हजारांपेक्षा जास्त दंड भरावा लागतो. हा दंड विशिष्ट प्रकारच्या गुळगुळीत दगडांच्या रूपात असतो. जंगलात यायचे असेल तर कपडे घालण्याची गरज नाही : बीबीसीशी बोलताना इथल्या रहिवासी अँड्रियाना मेरौडजी म्हणाल्या की, हे जंगल कायम महिलांसाठीच राखीव राहिलं आहे.
 त्यांचा जन्म झाला तेव्हाही ही परंपरा होती. इथले कोणतेही नियम बदलले नाहीत किंवा इथं बाहेरून कोणीही आलं नाही. जंगलात प्रवेश करण्यासाठी महिलांना आपले कपडे उतरवावे लागतात.
इथं राहणाऱ्या महिला खास प्रकारचे शिंपले (Sea shells) गोळा करून त्यांची विक्री करतात. यासाठी त्या समूहानं इथल्या समुद्रात आणि चिखलात उतरतात. मात्र आता शहरातील लोकवस्ती वाढत वाढत जंगलापर्यंत आली आहे. त्यामुळे या महिलांना आपल्या कामात अडचणी येत आहेत. प्रदूषणामुळंही इथल्या पर्यावरणाचा नाश होत आहे. पूर्वीच्या प्रमाणात इथं शिंपले मिळत नाहीत. आता हे शिंपले शोधण्यासाठी या महिलांना तासनतास पाण्यात शोध घ्यावा लागतो. पूर्वी 1-2 तासात त्याचं शिंपले गोळा करण्याचं काम पूर्ण होत असे, आता त्यांना हे शिंपले शोधण्यासाठी अख्खा दिवस लागतो. तरीही इथल्या महिलांनी ही परंपरा आजही जिवंत ठेवली आहे.
First published: