जाहिरात
मराठी बातम्या / Viral / स्कूटी चोरायला आले अन् भयंकर घडलं, स्वतःचीच गाडी सोडून पळाले चोर; पाहा VIDEO

स्कूटी चोरायला आले अन् भयंकर घडलं, स्वतःचीच गाडी सोडून पळाले चोर; पाहा VIDEO

चोरीचा डाव फसला.

चोरीचा डाव फसला.

गाडी चोरायला आलेल्या चोरांसोबत असं काही घडलं की त्यांना आपली गाडीही सोडून पळ काढण्याची वेळ आली.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 24 एप्रिल : चोरीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे, याचं कारणही तसंच आहे. कारण चोरी करायला आलेले चोर चोरी करण्याऐवजी धूम ठोकून पळाले. गाडी चोरताना असं काही घडलं की त्यांनी स्वतःचीच गाडी सोडून पळ काढला आहे. चोरी करताना चोरांसोबत असं काहीतरी घडलं की चोरी करणं सोडून त्यांनी भीतीने तिथून पळ काढला. दोन चोर जे स्कूटीवरून स्कूटी चोरायला आले होते पण त्यांना त्यांचीच स्कूटी तिथं सोडावी लागली. चोरीची ही अजब घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यानंतर हा व्हिीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका गेटमधून दोन व्यक्ती बाहेर पडताना दिसत आहेत. या व्यक्ती म्हणजे चोर आहेत. आलिशान कारमधून आले 2 चोर; सोनं-चांदी नव्हे तर पळवला पोपट कारण… घराबाहेर पार्क केलेली स्कूटी ते चोरताना दिसत आहे. दोघंही स्कूटीवर बसून आले होते. त्यानंतर एक चोर आपल्या स्कूटीवर आणि दुसरा चोरीच्या स्कूटीवर बसला. ते स्कूटी पळवत होते, इतक्यात कुणीतरी त्यांना पाहिलं आणि आरडाओरडा केला. त्यानंतर सर्व बाजूंनी माणसं धावत आली आणि चोरट्यांची चांगलीच धुलाई केली. त्याचवेळी चोरांचीही स्कूटी खाली पडली. ती स्कूटी उचलण्याचा प्रयत्न ते करत होते. पण लोकांनी त्यांना त्यांची गाडीही घ्यायला दिली नाही. शेवटी जीव महत्त्वाचा म्हणून चोरांनी आपली गाडीही तिथंच सोडली आणि तिथून आधी पळ काढला. रस्त्यावर पडलं होतं पैशांनी भरलेलं पाकिट, व्यक्तीने उचलताच…; काय घडलं पाहा VIDEO @Ambrish89 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

जाहिरात

ही घटना नेमकी कुठली आणि कधीची आहे माहिती नाही. व्हिडीओत दिलेल्या तारखेनुसार ही घटना 2 एप्रिल, 2023 ची आहे. पण नेमकी कुठली आहे. याबाबत माहिती नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात