मराठी बातम्या /बातम्या /Viral /आलिशान कारमधून आले 2 चोर; सोनं-चांदी नव्हे तर पळवला पोपट कारण...

आलिशान कारमधून आले 2 चोर; सोनं-चांदी नव्हे तर पळवला पोपट कारण...

फोटो - फेसबुक

फोटो - फेसबुक

पोपट चोरीचं प्रकरण चर्चेत आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

वॉशिंग्टन, 26 मार्च :  चोरीची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. कुणी पैसे, कुणी सोने-चांदी, तर कुणी इतर महागड्या वस्तू चोरल्या आहेत. पण कधी कुणी पोपट चोरल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? एका आलिशान कारमधून आलेल्या चोरांनी पोपट पळवला आहे. असंच एक प्रकरण चर्चेत आलं आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील ही घटना आहे.

ऑरेंज काऊंटीमधील एका घराबाहेर पिंजऱ्यात लावलेला पोपट अचानक गायब झाला. पोपट कुठे गेला म्हणून मालकाने डोअरबेल कॅमेरा चेक केला. त्यात जे दृश्य दिसलं ते पाहून त्याला धक्काच बसला. एक लाल रंगाची एसयूव्ही कार एका घराजवळ येऊन थांबली. या कारमधून दोन व्यक्ती बाहेर आल्या.  त्यांना पाहिल्यानंतर ते चोर आहेत, असं वाटतही नव्हतं. दोघंही अगदी आरामात घराच्या बाहेर आले आणि त्यांनी पोपट चोरला. पोपट घराबाहेरील पिंजऱ्यात कैद होता. पोपट चोरताच दोघंही आपल्या कारमध्ये जाऊन बसले.

SO SWEET! या पोपटाचं टॅलेंट पाहून सर्वजण झाले थक्क; एकदा पाहाच हा VIDEO

2 मार्च रोजीचीही ही घटना आहे पाळीव पोपटाच्या चोरीमुळे मालकाला दुःख झालं. हा पोपट या व्यक्तीसोबत दहा वर्षांपासून राहत होता. त्याने आपल्या पोपटाबाबत कुणालाही माहिती मिळाली तर आपल्याला कळवावं असं आवाहन केलं आहे.  फेसबुकवर एका व्यक्तीने पोस्ट केली आहे, ज्यात म्हटलं आहे, कृपया हे चोर कुठे दिसले तर सांगा. त्यांनी माझ्या भावाचा आफ्रिकन ग्रे पोपट चोरला आहे. पोपट आजारी आहे आणि त्याला औषधं द्यावी लागतात. याला घराबाहेरून चोरण्यात आलं.

हा साधासुधा पोपट नव्हता. हा ग्रे पॅरेट होता ज्याचं नाव लूना होतं. लाखो रुपयांचा हा पोपट. त्याची किंमत दोन लाख रुपये असल्याचं सांगितलं जातं आहे. बोलण्याच्या खास शैलीमुळे तो खूप फेमस होता.

बोलणारे पोपट खूप पाहिले आता या पोपटाचा VIDEO एकदा पाहाच; कान आणि डोळ्यावरही विश्वास बसणार नाही

या पोस्टवर बऱ्याच कमेंट येत आहेत. हा पोपट आपल्या मालकाला मिळेल, अशी आशा सर्वांनी व्यक्त केली आहे.

First published:
top videos

    Tags: Parrot, Thief, Thieves, Viral, Viral news