जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रस्त्यावर पडलं होतं पैशांनी भरलेलं पाकिट, व्यक्तीने उचलताच...; काय घडलं पाहा VIDEO

रस्त्यावर पडलं होतं पैशांनी भरलेलं पाकिट, व्यक्तीने उचलताच...; काय घडलं पाहा VIDEO

फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम

व्यक्तीने रस्त्यावर पडलेलं पाकिट उचललं आणि त्यानंतर असं काही घडलं ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 23 एप्रिल : रस्त्यावर चालताना तुम्हाला कधी ना कधी पैसे सापडले असतील. रस्त्यावर एखादं नाणं पडलेलं असंत, एखादी पैशांची नोट असते किंवा पैशांचं संपूर्ण पाकीटही असतं. एका व्यक्तीलाही रस्त्यावर पैशांनी भरलेलं असंच पाकीट दिसलं. त्या व्यक्तीने ते पाकीट हातांनी उचललं आणि खोलूनही पाहिल, त्याने ते पाकीट उघडताच… हा शॉकिंग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आता पैसे पाहिले की अनेकांना मोह आवरत नाही. काही लोक लक्ष्मी पायाखाली नको म्हणून ती उचलतात, काही लोक लालचेपोटी ते पैसे घेऊन आपल्याकडे ठेवतात, काही लोक या पैशांना लकी समजून आपल्या पाकिटात ठेवतात, काही जण ते पैसे कुणाचे याचा शोध घेतात, तर काही जण ते पैसे आपल्याकडे न ठेवता गरीब गरजूंना देतात. कारण काहीही असो पण रस्त्यावरील हे पैसे ज्याला दिसतात ती व्यक्ती ते नक्कीच उचलते. या व्यक्तीनेही तेच केलं. पण त्याच्यासोबत जे घडलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती रस्त्याने चालते आहे. रस्त्यावर एक पैशांचं पाकीट पडलेलं दिसतं आहे. त्या पाकिटात पैसेही आहेत. काय सांगता! घोरण्यासाठी मिळतो पैसा; ही घ्या कमाईची भन्नाट आयडिया पाकिट रस्त्यावर पडल्यानंतर त्यातील पैशांच्या नोटा बाहेर आलेल्या दिसत आहेत. आता असं पैशांनी भरलेलं पाकिट पाहिल्यानंतर ती व्यक्ती स्वतःला आवरू शकली नाही तिने ते पाकीट उचललं. उत्सुकतेपोटी त्या व्यक्तीने ते पाकीट उघडून पाहिलं आणि तिला मोठा धक्का बसला. कारण ते पाकिट खरं पाकीट नव्हतं. तर एक टेम्प्लेट होतं. जे अगदी पैशांच्या पाकिटासारखं दिसत होतं. काही क्षण तुम्हालाही ते पाकिटच वाटलं हो की नाही? पण जेव्हा ते उघडलं तेव्हा तुम्हालाही धक्का बसला असेल. काय सांगता! मोफत घर आणि 50 लाख रुपये रोख; सरकारची जबरदस्त ऑफर Loves_xpress नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंतची ही सर्वात बेस्ट जाहिरात आहे, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे.

जाहिरात

या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुमची यावरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात