वॉशिंग्टन, 27 नोव्हेंबर : खोल समुद्रात अगदी छोट्या माशांपासून ते मोठ्या माशांचं वास्तव असतं. पण माणूसच अनेकदा त्यांच्या क्षेत्रात अधिग्रहण करण्याचा प्रयत्न करत असतो. पाण्यातील भल्यामोठ्या शार्कच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाल्याचं, तर अनेक जण शार्कच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्याच्या अनेक घटना ऐकिवात आहेत. अशाच शार्कचा आणि एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये राहणारे जेसन मॅक्निटोश आपला ड्रोन कॅमेरा समुद्रावर उडवत होते. यावेळी त्यांना जराही कल्पना नव्हती की त्यांच्या ड्रोनमध्ये 10 फूट लांबीच्या शार्कचा व्हिडिओ कैद होत आहे. याहून त्यांना हैराण करणारी बाब म्हणजे, शार्कच्या आजूबाजूलाच एक व्यक्ती आरामात पोहण्याचा आनंद घेत होता. त्या व्यक्तीच्या अगदी काही अंतरावर, बाजूलाच भलामोठा शार्कही पोहत होता. (वाचा - पत्नीने फसवणुकीची दिली भयानक शिक्षा; पतीला पिंजऱ्यात बंद करून नदीत फेकलं ) 41 वर्षीय जेसन यांनी सांगितलं की, समुद्रातील वाईल्डलाईफ शूट करणं माझं पॅशन आहे. मी माझ्या ड्रोनला समुद्रापासून उंचांवर पाठवलं होतं. जेणेकरून मी समुद्रातील काही सुंदर दृश्य घेऊ शकेन. यावेळी काही छोटे मासे समुद्रात पोहताना मी ड्रोनद्वारे पाहिले. परंतु त्यानंतर जे पाहिलं, ते हैराण करणारं होतं.
(वाचा - स्वत:ला गायब करण्यासाठी व्यापाऱ्याची ट्रिक,शंभर पोलिसांनी 500 CCTVमधून लावला छडा )
एक व्यक्ती बॅकवर्ड अंदाजात समुद्रात पोहत होता. आणि त्याच्या अगदी बाजूला एक 10 फूट लांब शार्क फिरत असल्याचं ड्रोनमध्ये पाहिलं. हे पाहिल्यानंतरही मी त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे शार्कबाबत इशारा देऊ शकत नव्हतो. त्या पोहणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या बाजूला शार्कही आहे याची जराही कल्पना नव्हती. त्याने माझ्या ड्रोनमध्ये पाहत, आनंदात थम्प्स अपही दिलं होतं, असं जेसन म्हणाले.
(वाचा - ‘अरे क्या कर रहे हो’, केस कापताना चिमुरड्याची न्हाव्यालाच धमकी,VIRAL VIDEO पाहाच )
परंतु त्या व्यक्तीचं नशीब बलवत्तर की, शार्कने अगदी बाजूला असूनही त्यावर हल्ला केला नाही. ड्रोन कॅमेरातून दृश्य टिपणाऱ्या जेसन यांनी सांगितलं की, शार्क आपल्या क्षेत्रातच होता. आपल्याही हे विसरून चालणार नाही की, आपण त्यांच्या क्षेत्रात जातो.
(वाचा - बोटीत बसलेल्या महिलांवर व्हेलचा हल्ला; VIRAL VIDEO मध्ये पाहा पुढे नेमकं काय झाल )
जेसन यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर मिक फॅनिंगनेही (Mick Fanning) प्रतिक्रिया दिली आहे.
तीन वेळा सर्फिंग चॅम्पियन ठरलेले मिक 2015 मध्ये एका शार्कच्या हल्ल्यातून स्वत:ला वाचवण्यास यशस्वी ठरले होते. मिकनेही हा व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित करणारी प्रतिक्रिया दिली आहे.