वॉशिंग्टन, 6 नोव्हेंबर : कॅलिफोर्नियातील (California) अविला बीचवर कायकिंग करण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत मोठी धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात दोन महिला बोटीत बसून निसर्गाचा आनंद घेत आहेत. याचदरम्यान, अचानक एक हम्पबॅक व्हेलचा (Humpback Whale) हल्ला त्या बोटीवर होतो.
काय आहे प्रकरण -
सोमवारी जूली मॅकसोर्ले आणि लिज कॉट्रिएल कायकिंग करत होत्या. त्याचवेळी व्हेलने त्यांच्या बोटीवर हल्ला केला. महत्त्वाची बाब म्हणजे या भयंकर हल्ल्यात त्या दोघीही बचावल्या आहेत. हल्ल्यातून बचावलेल्या जूलीने सांगितलं की, व्हेल आमच्या अतिशय जवळ होता. काही समजण्यापूर्वीच व्हेलने आमची बोट हवेत उडवली आणि काही वेळात व्हेल पाण्यात असल्याचं पाहिलं.
Lucky to be alive: an Avila Beach woman says she is okay after a whale capsized her kayak (shown here). Hear from her and tips for staying safe out on the water tonight at 10&11. (Video: Kellie Balentine) @KSBY pic.twitter.com/WOy4itCzhW
— Melissa Newman (@melnewmantv) November 3, 2020
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून अनेक जण यावर हैराण आहेत.
नॅशनल जिओग्राफिकनुसार, हम्पबॅक व्हेल जगातील प्रत्येक समुद्रात आढळतो. या व्हेल्सला त्यांच्या जादुई गाण्यासाठी ओळखलं जातं. सध्या संशोधकांकडून यांच्या आवाजाच्या मागे असलेला संदेश ओळखण्याचा प्रयत्न सुरू आहे.