बिजिंग, 27 नोव्हेंबर : सोशल मीडियावर अनेकदा पती-पत्नीतील (Husband-Wife fight) भांडणाचे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही अगदीच गंभीर स्वरुपाचे असतात. पण एका महिलेने आपल्या पतीवरील संशयानंतर, पतीला शिक्षा देण्यासाठी सर्वात धोकादायक मार्ग निवडला. भयानक शिक्षेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पत्नीकडून शिक्षा मिळाल्यानंतर, पतीचा थोडक्यात जीव वाचला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टाईम्स नाउच्या वृत्तानुसार, चीनच्या माओमिंग शहरात एका पत्नीने आपल्या पतीला पिंजऱ्यात बंद केलं आणि त्याला नदीत फेकलं. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओनुसार, एक व्यक्तीला काही लोक रश्शीला बांधून, बांबूच्या पिंजऱ्यात टाकत होते. हा व्यक्ती आपल्या पत्नीला सोडून दुसऱ्याच महिलेसोबत आढळला होता. रिपोर्ट्सनुसार, महिलेने शिक्षा देण्याची जी पद्धत वापरली होती, त्याचा वापर चीनमध्ये प्राचीन काळात केला जात होता. (वाचा - कोरोना लशीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; म्हणाले… ) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दक्षिणी चीनच्या माओमिंग शहरात शुक्रवारी सकाळच्या वेळी घडली. सध्या त्या व्यक्तीची स्थिती स्थिर आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आल्याचं सांगितलं. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सोशल मीडिया युजर्सनी ‘पिग केज’ ही शिक्षेची अतिशय प्राचीन पद्धत असल्याचं म्हटलंय. काही जणांनी, या पिंजऱ्याचा उपयोग डुकरांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी होत असल्याचंही सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.