स्वत:ला गायब करण्यासाठी व्यापाऱ्याची ट्रिक, शंभर पोलिसांनी, 500 CCTV आणि कॉल्समधून लावला छडा

स्वत:ला गायब करण्यासाठी व्यापाऱ्याची ट्रिक, शंभर पोलिसांनी, 500 CCTV आणि कॉल्समधून लावला छडा

4 ते 5 राज्यांत 500 हून अधिक कॉल डिटेल्सची शोधाशोध करण्यात आली. त्यानंतर व्यापाऱ्याचा सुगावा लागला. परंतु ज्याप्रमाणे व्यापारी गायब झाला, ते पाहून पोलिसही हैराण आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर : गाजियाबादमध्ये (Ghaziabad) राहणारा एक व्यापारी आर्थिक समस्येमुळे घरातून गायब झाला. त्यामुळे कुटुंबियांनी व्यापारी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. पोलिसांनीही (Police) व्यापाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण कित्येक दिवस व्यापाऱ्याचा शोध लागत नव्हता. त्यानंतर 100 पोलिसांच्या 5 टीम बनवण्यात आल्या, 500 हून अधिक सीसीटीव्ही (CCTV) फुटेज शोधण्यात आलं.

4 ते 5 राज्यांत 500 हून अधिक कॉल डिटेल्सची शोधाशोध करण्यात आली. त्यानंतर व्यापाऱ्याचा सुगावा लागला. परंतु ज्याप्रमाणे व्यापारी गायब झाला, ते पाहून पोलिसही हैराण आहेत. पोलिसांनी व्यापाऱ्याला (Businessman) कोलकातामधून (Kolkata) ताब्यात घेतलं आहे.

(वाचा - धक्कादायक! 5 हजारात मारहाण, 10 हजारात...तरुणाने पोस्ट केली गुंडागिरीची रेट लिस्ट)

गाजियाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी 27 ऑक्टोबरला दिल्लीला जात असतानाचं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं गेलं. 28 ऑक्टोबरला व्यापारी दिल्लीत राहिला. त्यानंतर पंजाब-हरियाणामधून तो हिमाचलमध्ये पोहचला. 3 नोव्हेंबरला हिमाचलहून दिल्ली परताना कोलकातासाठी रवाना झाला. 5 नोव्हेंबरला दुपारी तो कोलकातामध्ये असल्याची माहिती मिळाली.

(वाचा - हे भलतच! या देशात होते रडण्याची स्पर्धा; रडून स्पर्धकांची हालत खराब, पाहा VIDEO)

त्यानंतर गाजियाबाद पोलिसांची टीम विमानाने कोलकातासाठी रवाना झाली. 6 नोव्हेंबरला सकाळी व्यापाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी केलेल्या चौकशीत व्यापाऱ्याने, आर्थिक परिस्थितीला कंटाळून तो स्वत: आपल्या इच्छेने घरातून निघाल्याचं सांगितलं.

(वाचा - बापरे! बूटामध्ये लपवले 119 प्राणघातक जिवंत कोळी, कारण याहीपेक्षा भयंकर)

Published by: Karishma Bhurke
First published: November 6, 2020, 2:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading