मराठी बातम्या /बातम्या /Viral /OMG! नवविवाहितांना 3 दिवस टॉयलेटला बंदी; 'या' देशात आजही पाळली जाते भयंकर प्रथा

OMG! नवविवाहितांना 3 दिवस टॉयलेटला बंदी; 'या' देशात आजही पाळली जाते भयंकर प्रथा

 इंडोनेशियात अनेक वर्षांपासून ही प्रथा पाळली जाते. असं न केल्यास नवविवाहीतांचा मृत्यू होऊ शकतो असं इथल्या टीडॉन्ग नावाच्या समुदायाला वाटतं.

इंडोनेशियात अनेक वर्षांपासून ही प्रथा पाळली जाते. असं न केल्यास नवविवाहीतांचा मृत्यू होऊ शकतो असं इथल्या टीडॉन्ग नावाच्या समुदायाला वाटतं.

इंडोनेशियात अनेक वर्षांपासून ही प्रथा पाळली जाते. असं न केल्यास नवविवाहीतांचा मृत्यू होऊ शकतो असं इथल्या टीडॉन्ग नावाच्या समुदायाला वाटतं.

दिल्ली, 11 जुलै : प्रत्येक देशामध्ये विवाहाच्या वेगवेळ्या प्रथा (Different Practices of Marriage) अस्तित्वात आहेत. जगातील जाती, धर्म आणि समाज यांच्या विवाहाच्या पद्धती खूप वेगळ्या आहे. भारताचाच विचार केला तर, वेगवेगळ्या परंपरा (Tradition) लग्नात पाळल्या जातात. भारतीय विवाह पद्धत अनेकांना आवडते. त्यामुळे काही परदेशी लोक देखील भारतात येऊन लग्न (Marriage) करतात.

मात्र इंडोनेशियामध्ये (Indonesia) एक अशी प्रथा आहे जिची चर्चा जगभरामध्ये केली जाते. प्रत्येक धर्मानुसार जातीनुसार लग्न करण्यासाठी काही पद्धती ठरवून दिलेल्या असतात. पारंपारिक पद्धतीने लग्न करताना त्यांचं पालन केलं जातं. आजच्या आधुनिक काळामध्ये लग्न हे स्टेटस सिम्बॉल जरी असलं तरी त्याचं धार्मिक महत्त्व ही तितकच आहे. त्यामुळेच आजही रजिस्टर मॅरेज बरोबरच परंपरागत पद्धतीने लग्न केले जातात.

(4 राशींच्या व्यक्तींचा वीकेंड उत्तम जाणार, पाहा आज तुमच्या राशीत काय?)

काही देशांमध्ये लग्न बद्दल काही प्रचलित प्रथा आहेत. ज्यांच्याबद्दल ऐकून आपल्याला आश्चर्य वाटतं. इंडोनेशियाच्या टीडॉन्ग (Tidong) नावाच्या समुदायांमध्ये देखील एक अनोखी प्रथा आजही पाळली जाते.

(लग्न राहिलं बाजूला, नवरा-नवरीने आधी जेवणावर मारला ताव; बकाबक खाताना VIDEO)

या प्रथेनुसार नवविवाहित जोडप्याला 3 दिवस शौचालयात जाण्याची परवानगी नसते. विवाह हे एक पवित्र बंधन असते याचे विधी धार्मिक असतात आणि त्यामुळेच वर-वधू शौचालयात गेल्यास त्याची पवित्रता भंग होते आणि अशुद्धी (Impurity) निर्माण होते अशी मान्यता आहे. त्यामुळेच नवविवाहित जोडप्याला कितीही इमर्जन्सी आली तरी शौचालयात जाण्यावर बंदी असते.

('मी इतकी सुंदर, हॉट पण एकही बॉयफ्रेंड पटेना', मॉडेलने मांडली आपली अजब व्यथा)

याशिवाय नवविवाहीत जोडप्यांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी देखील ही परंपरा पाळली जाते अशी मान्यता आहे की, शौचालयाची जागा घाण असते. या ठिकाणी नकारात्मक शक्ती वास करत असतात. जेव्हा नववधू किंवा वर शौचालयांमध्ये जातात तेव्हा त्यांच्यावर नकारात्मकतेचा प्रभाव पडतो आणि त्यांच्या नवीन जीवनामध्ये अडचण निर्माण होऊ शकतात. इतकेच नाही तर लग्न तुटण्याची भीती देखील या समुदायातल्या लोकांना वाटते.

असं म्हटलं जातं की लग्नानंतर नवरा किंवा नवरीने शौचालयाचा वापर केला तर ते त्यांच्यासाठी नुकसानदायक ठरतं. त्यांच्या जीवावर देखील बेतू शकतं आणि त्यांचे वैवाहिक आयुष्य खराब होऊ शकतं.

(कोरोनानंतर Bell's Palsy चा धोका; चेहऱ्यावर अशी लक्षणं असल्यास दुर्लक्ष करू नका)

याचा धारणेमधून 3 दिवस नवविवाहित शौचालयात जात नाहीत. त्यांना शौचाला जाण्याची इच्छा होऊ नये यासाठी 3 दिवस पाणी आणि जेवण देखील कमी दिलं जातं. ही प्रथा कितीही भयंकर वाटली तरी इंडोनेशिया मधल्या टीडॉन्ग समुदायांमध्ये आजही पाळली जाते. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.

First published:

Tags: Indonesia, Marriage