मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /'मी इतकी सुंदर, हॉट पण एकही बॉयफ्रेंड पटेना', मॉडेलने मांडली आपली अजब व्यथा

'मी इतकी सुंदर, हॉट पण एकही बॉयफ्रेंड पटेना', मॉडेलने मांडली आपली अजब व्यथा

आपल्या सौंदर्यामुळेच आपण सिंगल राहिलो असं या मॉडेलचं म्हणणं आहे.

आपल्या सौंदर्यामुळेच आपण सिंगल राहिलो असं या मॉडेलचं म्हणणं आहे.

आपल्या सौंदर्यामुळेच आपण सिंगल राहिलो असं या मॉडेलचं म्हणणं आहे.

बर्न, 09 जुलै: कोणत्याही तरुणाला तुला कशी गर्लफ्रेंड (Girlfriend) किंवा बायको हवी असं विचारलं. तर बहुतेकांच्या अपेक्षा यादीत सर्वात टॉपवर असतं ते म्हणजे सुंदर (Beautiful). एका सुंदर तरुणीच्या शोधातच बहुतेक तरुण असताच. पण तुम्हाला सांगितलं अशी सुंदर तरुणीच सध्या सिंगल आहे तर. म्हणजे जशी तरुणी तरुणांना गर्लफ्रेंड म्हणून हवी असते, तशा तरुणीलाच बॉयफ्रेंड (Boyfriend) सापडत नाही आहे, असं सांगितलं तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल नाही का? पण खुद्द या तरुणीनेच आपली ही विचित्र व्यथा मांडली आहे.

आयुष्यात समस्या नाही अशी एकही व्यक्ती नसावी. प्रत्येकाला काही ना काही समस्या असते. कुणाकडे पैसा नसतो, कुणाकडे नोकरी नसते, कुणी आजारी असतं. अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी असतात. पण स्वित्झर्लंडची (Switzerland) मॉडल सेलिना केन्टीनोची (Céline Centino) समस्या म्हणजे ती सुंदर आणि हॉट असूनही तिला बॉयफ्रेंड नाही.  सुंदर असूनही 7 वर्षांपासून ती सिंगल (Single model) आहे. आपल्या सौंदर्यामुळेच आपल्याला कुणी पार्टनर मिळत नाही, असा 26 वर्षांच्या सेलिनाचं म्हणणं आहे.

हे वाचा - केसांसाठी सगळे उपाय करून झाले? ‘या’ Home Remedies करूनच पाहा; केस वाढतील तिपटीने

सेलिना सांगते, जेव्हा आपण घराबाहेर असतो तेव्हा पुरुष तिच्याकडे पाहतात पण जेव्हा ती त्यांच्याकडे पाहून हसते तेव्हा सर्व पळून जातात. तिच्यासोबत कोणी फ्लर्टही करत नाही.  कुणी डेटवर जायला तयार होत नाही. चुकून कुणी तिच्याशी बोललंच तर हेलोच्या पुढे काहीच बोलण्याची त्याची हिंमत होत नाही.  अगदी नशेतही पुरुष तिच्याजवळ येण्यापासून घाबरतात. ती इतकी सुंदर आहे, की ती सिंगल आहे यावर कुणाचाच विश्वास बसत नाही.

सेलिनाला नेमका कसा बॉयफ्रेंड हवा ते तिनं सांगितलं आहे. तशा तिच्या अपेक्षा फार जास्त नाही. तिला हायटेड म्हणजे जास्त उंच मुलं आवडतात. बाकी तिला त्यांचा चेहरा किंवा हेअरस्टाइलमुळे काही फरक पडत नाही. लुकपेक्षा पर्सनालिटी चांगली असावी असं तिचं म्हणणं आहे. तसंच तो मुलगा फनी असावा.

हे वाचा - 85 वर्षांची 'तरुणी' शोधतेय नवा बॉयफ्रेंड, नुकताच झालाय तिशीतल्या मुलाशी ब्रेकअप

सेलिना म्हणाली, एकेकाळी मी खूप कुरूप आहे, असं मला वाटायचं. मी कुठे बाहेरही फार जायची नाही. त्यानंतर तिने हेअरड्रेसरटी नोकरी केली. पैसे वाचवून तिनं आपली पहिली ब्रेस्ट सर्जरी केली. त्यानंतर मात्र तिने बऱ्याच सर्जरी करून घेतल्या.

First published:
top videos

    Tags: Beauty queen, Boyfriend, Lifestyle, Model