• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • लग्न राहिलं बाजूला, नवरा-नवरीने आधी जेवणावर मारला ताव; कसे बकाबक खातायेत पाहा VIDEO

लग्न राहिलं बाजूला, नवरा-नवरीने आधी जेवणावर मारला ताव; कसे बकाबक खातायेत पाहा VIDEO

भुक्कड नवरा-नवरीचा (Bride Groom) मजेशीर व्हिडीओ (Funny Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतो आहे.

 • Share this:
  मुंबई, 09 जुलै : बहुतेक लग्नांमध्ये (Wedding) आपण पाहिलं आहे की नवरा-नवरी (Bride Groom) लग्नाच्या विधी  (Wedding Rituals)  होईपर्यंत काही खात नाहीत. एकतर त्यांना उपवास धरायला सांगितला जातो किंवा हलकं काहीतरी खायला-प्यायला दिलं जातं. सर्व पाहुणे जेवल्यानंतर नवरा-नवरी आपल्या कुटुंबासोबत एकत्र जेवायला बसतात. पण सध्या अशा नवरा-नवरीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यांनी आपल्याच लग्नात लग्नाआधी जेवणावर ताव मारला (Bride Groom eating food before marriage) आहे. लग्नाचा हा व्हिडीओत (Wedding video) चर्चेत आहे. आधी पोटोबा मग विठोबा असं म्हणतात. पण स्वतःच्याच लग्नात कोण बरं असं करतं? नवरा-नवरीने (Bride Groom Video) आपल्याच लग्नात आधी पोटोबा केला आहे. या दोन्ही भुक्कड नवरा-नवरीचा  मजेशीर व्हिडीओ (Funny Video)  सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतो आहे.
  नवरा आणि वधू दोघंही खाण्याचे खूप शौकिन आहेत. त्यात त्यांना भूक लागली आहे. दोघांचाही स्वभाव सारखा असल्याने दोघांनीही आपल्या लग्नाआधी खाण्याला पसंती दिली. दोघांच्याही हातात जेवणाची थाळी आहे. वेगवेगळ्या पदार्थांचा ते आस्वाद घेताना दिसत आहेत. हे वाचा - नवरदेवाच्या स्वागताला आली खुद्द नवरी, आधी पुष्पहार घातला नंतर...; VIDEO VIRAL व्हिडीओ तुम्ही ऐकला तर नवरा आपल्या हातात थाळी पकडत नवरीला सांगतो, लग्नवगैरे होत राहिल, आधी जेऊन घे. हे ऐकून नवरीलाही इतका आनंद होतो की तीसुद्धा आपल्या प्लेटमधील पदार्थ खात सुटते. ती खाण्यात इतकी मग्न आहे की तिला इतर नवरींप्रमाणे आपल्या मेकअपचीही काही चिंता नाही. तसं ती बोलतानाही दिसते. हे वाचा - VIDEO : आंदोलन आहे की लग्नाचा मंडप? वऱ्हाड्यांच्या घोषणांनी कार्यालय दुमदुमलं दुल्हनिया इनस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. असे भुक्कड किंवा फुडी नवरा-नवरी आपण आतापर्यंत पाहिलं नसल्याचीच प्रतिक्रिया बहुतेकांनी दिली आहे.
  Published by:Priya Lad
  First published: