आज 10 जुलै 2021. ज्येष्ठ अमावास्या. शनिवार. शनि अमावस्या सकाळी 6.46 पर्यंत. चंद्र मिथुन राशीत भ्रमण करेल. आजचं बारा राशींचं भविष्य.
मेष
आजचं ग्रहमान ठिक असून काही विशिष्ट चिंता सतावू शकते. शनी अमावास्या सकाळी 6.46 पर्यंत आहे. आज विशेष दान किंवा जप करा. दिवस शांतपणे घालवा.
वृषभ
धनस्थानातील सूर्य चंद्र आर्थिक व्यवहार जपून करा असं सांगत आहेत. वाणी ओजस्वी, कुटुंब सुख उत्तम असा हा दिवस आहे. आज राहू नवीन कामात मदत करेल. दिवस बरा आहे.
मिथुन
राशीत होणारी ग्रहांची गर्दी प्रकृतीची काळजी घ्या असं सुचवते आहे. व्यय स्थानात राहू आणि धन स्थानातील मंगळ अशा पाप कर्तरी योगात मिथुन राशीच्या व्यक्ती सापडल्या आहेत. अमावस्येच्या पार्श्वभूमीवर सांभाळून राहण्याची गरज आहे. दिवस मध्यम आहे.
कर्क
आज व्यय स्थानातील ग्रह आणि राशीतील मंगळ फारसे अनुकूल नाहीत. फार विशेष काही करू नका. दिवस शांत घरात घालवा.
प्रकृतीची काळजी घ्या. वाहन सांभाळून चालवा.
सिंह
आज दिवस फारसा अनुकूल नाही. विषाणू पासून होणारे विकार, ताप यापासून जपा. काहींना अचानक आर्थिक नुकसान होईल. पण संतती मनासारखी वागेल. वरिष्ठ मदत करतील. दिवस मध्यम.
कन्या
आज कन्या राशीच्या व्यक्ती मौजमजेसाठी वेळ काढतील. दिवस कुठेतरी जाऊन आनंदात घालवतील किंवा घरीच अगदी आराम करतील. आर्थिक लाभ संभवतात. दिवस चांगला.
तुला
आज सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी एखादी चांगली घटना घडेल. तुमचं मनोबल अणि धैर्य कायम ठेवण्यात यश येईल. धार्मिक आस्था वाढेल. काही नामजप पूजा इत्यादीमध्ये वेळ जाईल. दिवस चांगला.
वृश्चिक
मानसिक ताण, शारीरिक थकवा किंवा कष्ट जाणवतील. दिवस अगदी शांतपणे घालवा, कुठलंही धाडस, प्रवास मनस्ताप देणारा ठरेल. निर्णय लांबणीवर टाका. दिवस मध्यम जाईल.
धनु
आज दिवस अगदी दैनंदिन कामं, रोजचे व्यवहार आणि कुटुंबातील व्यक्ती सोबत घालवा. मानसिक आंदोलनं होतील. मंगळ कर्क राशीत अष्टमात आहे. प्रवास टाळा. दिवस मध्यम आहे.
मकर
आज तुमच्यासमोर शत्रू टिकणारा नाही. प्रकृतीकडे जरा लक्ष असू द्या. बाकी आर्थिक बाजू चांगली राहील. पण देण्याघेण्याचे व्यवहार टाळा. जोडीदाराची काळजी घ्या. दिवस चांगला जाईल.
कुंभ
बौद्धिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक बाजू चांगली राहील. आरोग्य थोडं जपावं लागेल. संतती सौख्य मिळेल. लाभ होतील. नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. दिवस शुभ.
मीन
घरांमध्ये आज तुमचा भरपूर वेळ जाईल. काही जास्तीची कामं वेळ घेतील. गुरूची उपासना करावी. नोकरीच्या ठिकाणी तुमचं महत्त्व वाढेल. दिवस शुभ आहे.
शुभम भवतु!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.