मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कोरोनानंतर Bell's Palsy चा धोका; चेहऱ्यावर अशी लक्षणं असल्यास दुर्लक्ष करू नका

कोरोनानंतर Bell's Palsy चा धोका; चेहऱ्यावर अशी लक्षणं असल्यास दुर्लक्ष करू नका

कोरोना रुग्णांमध्ये बेल्स पाल्सीचा (Bell's Palsy) धोका सातपटीने वाढतो.

कोरोना रुग्णांमध्ये बेल्स पाल्सीचा (Bell's Palsy) धोका सातपटीने वाढतो.

कोरोना रुग्णांमध्ये बेल्स पाल्सीचा (Bell's Palsy) धोका सातपटीने वाढतो.

    मुंबई, 10 जुलै : गेल्या दीड वर्षापासून कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गाने संपूर्ण जगामध्ये थैमान घातलं आहे. कोरोनामुळे काही रुग्णांना गंभीर समस्या तर होतेच पण अशा गंभीर स्वरूपाचा कोविड (Covid19) झालेल्या किंवा होऊन गेलेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती (Immunity) कमी होते. त्यामुळे अशा रुग्णांना सायटोमेगलोसारख्या (Cytomegalovirus) विषाणूचा संसर्ग किंवा म्युकरमायकोसिससारखा (Mucormycosis) बुरशीजन्य विकार होण्याची शक्यता वाढत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. कोरोना रुग्णांना ज्यापासून काळजी घ्यायला हवी, अशा विकारामध्ये आता आणखी एकाची भर पडली आहे, तो म्हणजे बेल्स पाल्सी (Bell's Palsy).

    जगभरातले शास्त्रज्ञ कोरोनाविषयक संशोधन करत आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्याची लक्षणं, कोरोना झाल्यानंतर काय काय काळजी घ्यावी, तसंच त्यादरम्यान काय काय त्रास होऊ शकतो, अशा विविध विषयांचा त्यात समावेश आहे. कोरोना रुग्णांना बेल्स पाल्सीचा जास्त असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. बेल्स पाल्सी म्हणजे चेहऱ्याला लकवा मारणं. कोरोना रुग्णांमध्ये याचा धोका सातपटीने वाढतो.

    हे वाचा - कोरोनानंतर Bone death चा धोका; नेमका काय आहे हा आजार?

    युनिव्हर्सिटी हॉस्पिटल क्लीव्हलँड मेडिकल सेंटर आणि केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थांमधल्या शास्त्रज्ञांनी एक नवं संशोधन केलं आहे. त्या संशोधनाच्या हवाल्याने 'दैनिक भास्कर'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे, की कोरोनाच्या एक लाख रुग्णांपैकी 82 जणांना बेल्स पाल्सी विकार झाल्याचं संशोधनात आढळलं. 3 लाख 48 हजार कोरोना पेशंट्सपैकी (Corona Patients) 284 पेशंट्सना बेल्स पाल्सी झाल्याचं निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवलं आहे. यापैकी 54 टक्के पेशंट्सना त्यापूर्वी कधीच बेल्स पाल्सीचा त्रास झाला नव्हता. उर्वरित 46 टक्के पेशंट्सना पूर्वी बेल्स पाल्सीचा त्रास झाला होता.

    बेल्स पाल्सी म्हणजे काय?

    बेल्स पाल्सी हा शरीरातल्या स्नायूंशी निगडित असलेला अर्धांगवायूसदृश (Paralysis) विकार आहे. अर्धांगवायूमध्ये अर्धं शरीर निकामी होतं. बेल्स पाल्सीमध्ये चेहरा एका बाजूने लटकल्यासारखा होतो. पेशंटला गाल फुगवण्यास, गालाची हालचाल करण्यास त्रास होतो. याचा डोळ्यांच्या पापण्यांवर आणि भुवयांवरही परिणाम होतो. डोळ्यांच्या पापण्या मिटलेल्या किंवा अर्धोन्मीलित राहतात. हा विकार होण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही; मात्र काही संशोधकांच्या म्हणण्यानुसार, शरीरात प्रवेश केलेल्या विषाणूशी किंवा रोगाशी संघर्ष करण्यासाठी शरीराची जी प्रतिकार यंत्रणा काम करते, तिच्या ओव्हररिअॅक्शनमुळे (Over Reaction) चेहरा किंवा विशिष्ट अवयव सुजतो. त्याचा परिणाम स्नायूंवर होऊन ते निकामी होतात.

    संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हा त्रास उद्भवल्यावर दोन महिन्यांत यावर योग्य उपचार करण्यात आले, तर हा विकार लवकर बरा होऊ शकतो. यातून बाहेर येण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधीही लागू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

    हे वाचा - अरे देवा! कोरोनापासून सुटका नाहीच; मोदी सरकारने महासाथीबाबत दिली मोठी माहिती

    कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या (Vaccine) एक लाख पेशंट्सपैकी केवळ 19 जणांनाच बेल्स पाल्सी झाल्याचं निरीक्षणही शास्त्रज्ञांनी नोंदवलं आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांमधला बेल्स पाल्सीचा धोका कमी करायचा असेल तर लस घेणं अत्यावश्यक असल्याचंही शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. संशोधनात सहभागी झालेल्या 74 हजारांपैकी 37 हजार जणांनी लस घेतली होती. त्यामध्ये 8 जणांना बेल्स पाल्सी झाल्याचं आढळलं.

    First published:

    Tags: Corona patient, Coronavirus, Covid-19