मुंबई 11 डिसेंबर : तरुण मंडळींना स्टंटबाजी करायला खूपच आवडते. त्यांना वाटतं की ते यामुळे खूपच पुढारलेले वाटतात किंवा मित्रांमध्ये त्यांची वाहवा होईल. पण बऱ्याचदा त्याच्या अगदी विरुद्ध घडते. ज्यामुळे हे तरुण गंभीर जखमी होतात. तर अनेकांनी आपले प्राण देखील गमावले आहेत. या संदर्भात अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर देखील तुम्ही पाहिले आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे ज्यात काही मुले शाळा सोडून स्टंट करत असताना त्यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. या तरुणांना वाटलं की त्यांना कोणीही पकडू शकणार नाही. पण अखेर ते पकडले गेलेच, ज्यामुळे त्याचं नाव देखील शाळेतून काढण्यात आलं आहे. हे ही वाचा : चालत्या कारवर अचानक पडली वीज, पुढे जे घडलं ते आश्चर्यचकीत करणारं, पाहा Video हा व्हिडीओ बिजनौर मधील आहे. परंतु काही सेन्सिटीव्ह कारणामुळे आम्ही तो तुम्हाला दाखवू शकत नाही. वास्तविक, या स्टंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील बिजनौरची आहे. येथील एका शाळेत शिकणारी काही मुले शाळा सोडून जंगलात मजा मस्करी करत फिरत होते. तेथे ते एकमेकांवर पेट्रोल बॉम्ब फेकत होते आणि यावेळी एका मुलाचे मोठे नुकसान झाले आहे. हे ही पाहा : Viral Video: याला म्हणतात कर्माचं फळ, तरुणाने म्हशीला लाथ मारली आणि… एका मुलाच्या हातातून पेट्रोल बॉम्ब पडल्याने त्याच्या कपड्यांमध्ये आग लागली. कशीतरी ही आग विझवण्यात विद्यार्थ्याने यश मिळवले, मात्र तोपर्यंत विद्यार्थ्याच्या पाठीचा कणा मोठ्या प्रमाणात भाजला. हा सर्व प्रकार शाळेजवळच्या जंगलात घडला. जिथे काही अंतरावर दोन विद्यार्थी दिसतात आणि दोघेही पेट्रोल बॉम्ब जंगलात फेकत आहेत. हा व्हिडीओ समोर येताच शाळेनेही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टंट करणार्या विद्यार्थ्यांची नावे शाळेतून काढली आहे, तसेच त्यांच्या कुटुंबीयांनाही कळवण्यात आले आहे. दुसरीकडे, पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.